Header AD

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ८ दिवसात ७० हजार रुपये दंड वसूल पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात असली तरी शासनच्या नियमनाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.सामाजिक अंतर ठेवणे शक्य नसले तरी तोंडावर मास्क लावून आपण या महामारीला आपल्यापासून दूर ठेवू शकतो. परंतु काही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने प्रशासनाकडून कडक कारवाई सुरु झाली आहे.डोंबिवलीतील पालिकेच्या `ह`प्रभाग क्षेत्र हद्दीत पोलिस आणि पालिकेने केलेल्या संयुक्त कारवाईत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ८ दिवसात तब्बल ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आले.           लॉकडाऊनमध्ये शितीलता दिली असली तरी अजून करोन संपला नाही याचा नागरिकांना विसर पडला असल्यासारखे सावर्जनिक ठिकाणी वागत असल्याचे दिसते.करोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र जास्तीत जास्त लसीकरण आणि नियमांचे पालन करून करोनाला महामारी दूर ठेवू शकतो , त्यामुळे नियमाचे पालन करा असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.कल्याण – डोंबिवली महानगरपाकिकेच्या हद्दीत करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नागरिक गाफित राहून नियमांचे पालन करत नाहीत.सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क परिधान न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 
     पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशनुसार डोंबिवलीत पश्चिमेत पालिका `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख  विजय भोईर यासह दिलीप बुवा भंडारी, बाजीराव आहेर आणि कर्मचारी व स्थानिक पोलीस यांनी मास्क परिधान न करणारे नागरीक आणि वाहनचालकांवर संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली.         गेल्या आठ दिवसात डोंबिवली पश्चिमेत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ८ दिवसात ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आले. तर काही वाहनचालकांकडे  लायसन नसल्याने त्या वाहनचालकांवर तोही दंड लावण्यात आला.कोपर पुलाजवळ आणि  स्टेशनबाहेरील परिसरात सदर कारवाई करण्यात आली.

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ८ दिवसात ७० हजार रुपये दंड वसूल पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ८ दिवसात ७० हजार रुपये दंड वसूल पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई Reviewed by News1 Marathi on September 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads