Header AD

त्या अडीच वर्षांची भरपाई मोदी - फडणवीस करणार का? ओबीसी नेते राज राजापूरकर
ठाणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणातून छगन भुजबळ यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. केवळ विरोधकांचा आवाज क्षीण करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने मोदींच्या मदतीने भुजबळ यांना अडकविले होते, हेच आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या तुरुंगांतील अडीच वर्षांची भरपाई मोदी-फडणवीस करतील का? की पापक्षालनासाठी राजकीय संन्यास घेतील?   


            असा सवाल ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी उपस्थित केला आहे.  महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या मुक्ततेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी अत्यंत कडक शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.   नाझीवाद जोपासण्यासाठी हिटलरने आपल्या विरोधकांना तुरुंगात डांबले होते किंवा त्यांची हत्या घडवून आणली होती.               भारतामध्येही हीच संस्कृती 2014 नंतर रुजली आहे. छगन भूजबळ हे मोदी- फडणवीस यांची सभागृह आणि सभागृहाबाहेर कोंडी करीत होते. आक्रमक आणि अभ्यासू भाषणांमुळे राज्यातील तत्कालीन सरकारचे वाभाडे काढत होते. त्यामुळे या सरकारची पोलखोल होणार असल्यानेच त्यांना तुरुंगात डांबून आपले हित साधण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला होता.               


  

          मात्र, आता न्यायालयाने त्यांना तोंडावर पाडले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे आता तोंडघशी पडले असून जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही राजापूरकर यांनी म्हटले आहे.

त्या अडीच वर्षांची भरपाई मोदी - फडणवीस करणार का? ओबीसी नेते राज राजापूरकर त्या अडीच वर्षांची भरपाई मोदी - फडणवीस करणार का? ओबीसी नेते राज राजापूरकर Reviewed by News1 Marathi on September 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads