Header AD

‘मान्यवर’ शोरुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने■हिंदूंची माफी मागून कन्यादाना’ विषयी आक्षेपार्ह जाहिरात मागे घेण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावनी..


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  मान्यवर’ शोरुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने केली. हिंदूंची माफी मागून कन्यादाना’ विषयी आक्षेपार्ह जाहिरात मागे घेण्याची चेतावनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली आहे.वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीच्या मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडने हिंदूंच्या विवाह संस्कारातील कन्यादान’ नकोतर कन्यामान’ म्हणा’, असा धार्मिक कृतींविषयी अपप्रचार करणारी जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. या जाहिरातीमुळे व्यापक आणि उच्च मूल्य जोपासणार्‍या धार्मिक विधीविषयी लोकांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या जाहिरातीचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली आहेत. वेदांत फॅशन्स लि. कंपनीने हिंदूंची बिनशर्त माफी मागून मान्यवर’ ब्रँडची ही जाहिरात त्वरित मागे घ्यावीअशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केली.   या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह हिंदू धर्मप्रेमींनी हातात निषेध फलक धरून लोकांमध्ये जागृती केली. ही जाहिरात मागे घेऊन जोपर्यंत माफी मागत नाहीतोपर्यंत हिंदु समाजाने मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावाअसे आवाहनही या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले.        ‘मान्यवरने प्रसारीत केलेल्या जाहिरातीतून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले असून कन्यादान’ कसे चुकीचे आहेप्रतिगामी आहेतसेच दान करायला कन्या वस्तू आहे का ?’, असे संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. कन्यादान’ नकोतर कन्यामान’, असा थेट परंपरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.          मुळात अन्य कोणत्याही धर्मात स्त्रियांना सन्मान दिला जात नाहीयाउलट आदिशक्ती म्हणून स्त्रीची पूजा केली जाते. असे असतांना त्याविषयी चुकीचा संदेश पसरवणार्‍या वेदांत फॅशन्स लि. कंपनीने अन्य धर्मातील महिलांविषयी चुकीच्या प्रथा-परंपरांविषयी प्रबोधन करणारी जाहिरात काढण्याची हिंमत करून दाखवावी. मान्यवर  ब्रँडची जाहिरात मागे न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईलअसेही डॉ. धुरी यावेळी म्हणाले.

‘मान्यवर’ शोरुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने ‘मान्यवर’ शोरुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने Reviewed by News1 Marathi on September 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads