Header AD

कल्याण मध्ये १३८ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
कल्याण , कुणाल म्हात्रे  जीवन तेव्हा महत्वसपूर्ण ठरते जेव्हा ते इतरांसाठी जगले जाते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कथनाला मूर्त रूप देत संत निरंकारी सत्संग भवनकोनगावकल्याण (पश्चिम) येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १३८ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या शिबिरामध्ये रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढीकडून पार पाडण्यात आले.      संत निरंकारी मिशनच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबिरांची अविरत श्रृंखला चालू केलेली असून त्या अंतर्गत मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच संपूर्ण राज्यामध्ये आणि देशाच्या विविध भागात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. मंडळाच्या कल्याण ब्रांचमधील हे शिबिरदेखील याच व्यापक रक्तदान अभियानाचा भाग आहे.     या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबेकोनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश मुकादमकल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्याहस्ते संयुक्तरीत्या दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये पंचायत समिती सदस्य दर्शन म्हात्रेग्रामपंचायत सदस्य कमलाकर नाईकडॉ. अमोल कराळेशिवसेना विभाग प्रमुख प्रल्हाद राखाडे, बुर्दुल ग्रामपंचायत सरपंच सुनील पाटील, समाजसेवक नंदू राखाडे आदि मान्यवरांचा सहभाग होता. मंडळाच्या विविध शाखांचे मुखी तसेच सेवादलाचे अधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.    मंडळाची सामाजिक कार्ये सांभाळणाऱ्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे आणि स्थानिक सेवादल संचालक प्रकाश कोकतरे यांनी स्थानिक सेवादल युनिट स्वयंसेवकांच्या सहकार्याने केले.

कल्याण मध्ये १३८ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान कल्याण मध्ये १३८ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads