Header AD

जगाला कोरोनामुक्त करा गणराया – डॉ. जे. पी. शुक्ला टाकाऊ वस्तूं पासून साकारला गणरायाचा देखावा




कल्याण , कुणाल  म्हात्रे : जगाला कोरोना मुक्त करा गणराया असे साकडे घालत कल्याण पूर्वेतील पिसवली येथील डॉ. जे. पी. शुक्ला यांनी टाकाऊ वस्तूंपासून देखावा साकारत पर्यावरण बचावाचा संदेश दिला आहे.   



कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न भारत करत असून अशातच गणेशोत्सवाचा उत्साह देखील पाहायला मिळत आहे. याच उत्साहाच्या वातावरणात पिसवली येथील डॉ. जे. पी. शुक्ला यांच्या कुटुंबीयांनी देखील आपल्या घरी गणरायाचे आगमन केले असून बेस्ट आउट ऑफ वेस्ट  सुतल, लाकडं, भूसा असे अनेक साहित्य वापरून गरायचे मंदिर साकारण्यात आले आहे. यावेळी मास्क लावणे, हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे हे कोरोनाचे नियम पाळून आसपासच्या गणेश भक्तांना गणरायाचे दर्शन देण्यात आले.



 यावेळी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी भारताला नव्हे तर सम्पूर्ण जगाला  कोरोना मुक्त करण्याचे निवेदनाचे चित्र देखाव्यात साकारण्यात आले. याची संकल्पना डॉ. जेपी. शुक्ला आणि पुष्पा शुक्ला यांची होती. सजावट पिंटू राम यांनी केली. तर बबन चौबे, दीपक चौबे आणि समस्त शुक्ला परिवाराने गणेश भक्तांचे स्वागत केले. यावेळी सुंदरकांड पाठचे आयोजन देखील करण्यात आले होते.

जगाला कोरोनामुक्त करा गणराया – डॉ. जे. पी. शुक्ला टाकाऊ वस्तूं पासून साकारला गणरायाचा देखावा जगाला कोरोनामुक्त करा गणराया – डॉ. जे. पी. शुक्ला टाकाऊ वस्तूं पासून साकारला गणरायाचा देखावा Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads