Header AD

ठाणे महापालिकेच्या वतीने "आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस" साजरा

 

■ठाणे महापालिकेच्यावतीने साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाच्या कार्यक्रमाची छायाचित्रे..


ठाणे , प्रतिनिधी  :  हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती निर्माण होण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने ’’वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणाकरिता मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करून "आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.       यावेळी परिवहन समिती सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, प्रादेशिक परिवहन विभागाचे विश्वेश्वर शिंदे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, सिनिअर केमिस्ट राजू जाधव, विद्या सावंत, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.कोकणे, औदयोगिक विभागाचे संचालक रोहित मिलन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच परिवहन सेवेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.       कोरोना काळात लॉकडाऊमुळे हवा मोठ्या प्रमाणात शुद्ध झाली आणि आकाश निरभ्र व निळेशार दिसू लागले. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) ७ सप्टेंबर २०२० हा दिवस ‘इंटरनॅशनल क्लीन एअर डे फॉर ब्लू स्काय’’ म्हणून घोषित केला असून प्रत्येक वर्षी हा 'निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे.  यावर्षीही ठाणे महापालिकेच्यावतीने ७ सप्टेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.     आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाचे औचित्य साधून 'वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणाकरिता मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमात, परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी हवा प्रदूषण रोखण्याबाबत ठामपाच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले.          यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसचे अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या साफसफाईचे व पीयूसी करतानाचे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच सीएनजी गॅसबाबत व पीयूसी प्रमाणपत्राची माहिती देण्यात आली. यासोबतच सिनिअर केमिस्ट राजू जाधव यांनी देखील हवा प्रदूषणाबाबत मार्गदर्शन केले.        हवा प्रदूषणाशी निगडीत महत्वाचे घटक, वाहतूक प्रदूषण, औद्योगिक उत्सर्जन, डीजी सेट आणि वीट भट्ट्या, बायोमास, पीक, कचरा जाळल्याने होणारे उत्सर्जन तसेच बांधकाम व तोडफोड कचऱ्यामधून होणारे धूळ प्रदूषण, वाहनांची निगा व देखभाल,पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण, लेन ड्रायविंग तसेच सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणे आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ''माझी वसुंधरा अभियान २०२०'' अंतर्गत हरित शपथेचे वाचनही यावेळी करण्यात आले..

ठाणे महापालिकेच्या वतीने "आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस" साजरा ठाणे महापालिकेच्या वतीने "आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस" साजरा Reviewed by News1 Marathi on September 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads