Header AD

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नरेंद्र पवार यांनी घेतली भेट कल्याण - कसारा - कर्जत रेल्वे प्रवाश्यांच्या समस्यां बाबत केली चर्चा




कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी समस्यारेल्वे कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजनाजळगाव जिल्ह्यातील रेल्वे समस्यासीएसटी ते पंढरपूर- सांगोला एक्सप्रेस सुरू करावी आदी मागण्यांसाठी आज माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली.



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज सभागृहात झालेल्या या चर्चेत माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासमवेत कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगावदिवाडकर समुहाचे गौतम दिवाडकरप्रतिनिधी सचिन जाधवबजरंग अग्रवालभाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारेभाजपा  युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाईआत्माराम फडराहुल भोईर, दर्शन बाबरेब्रिजेश त्रिपाठीराजेश सिंगएच एस बाबरवैशाली परदेशीकुंदा चंदणेअरुणा गोखले आदी उपस्थित होते.



कल्याण कसारा कर्जतच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी कल्याण कसारा कर्जत तिसरी व चवथी मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करणेकल्याण यार्ड रिमोडलिंग प्रकल्प मार्गी लावावाआसनगाव महत्वाचे स्थानक असल्याने होम प्लॅटफॉर्म सेवा उपलब्ध करावीजीआरपी चौकी प्रत्येक स्थानकात असावी यामागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. 



२००४ पूर्वी नियुक्त झालेल्या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावीठाणे जिल्ह्यातील हजारो खान्देशातील प्रवाश्याच्या मागणीवरून मुंबई-भुसावळ एक्सप्रेस सुरू करण्यात यावीसीएसटी ते पंढरपूर-सांगोला एक्सप्रेस सुरू करण्याबाबत नरेंद्र पवार यांनी रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत चर्चा केली. या सगळ्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. या चर्चेत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नरेंद्र पवार यांनी घेतली भेट कल्याण - कसारा - कर्जत रेल्वे प्रवाश्यांच्या समस्यां बाबत केली चर्चा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नरेंद्र पवार यांनी घेतली भेट कल्याण - कसारा - कर्जत रेल्वे प्रवाश्यांच्या समस्यां बाबत केली चर्चा Reviewed by News1 Marathi on September 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads