Header AD

गणेशोत्सवाचा निधी तरुणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिये साठी कल्याणच्या विजय तरुण मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले उत्सवातुन "जनजागृती व समाज प्रबोधनाचा" वारसा जपणाऱ्या कल्याण शहरातील विजय तरुण मंडळाने कोरोना महामारीत देखील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. कल्याण मधील रामबाग परिसरात  विजय तरुण मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठया भक्तीभावात साजरा केला जातो. गणेशोत्सव दरम्यान समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देत हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपत असते. यंदा या मंडळाने एका तरुणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी एक लाखांचा निधी मदत म्हणून दिला आहे.गेल्या काही वर्षात मंडळातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना, रुग्णांना, शहीदांच्या कुटुंबाला, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. यंदा उत्सवाचे ५८ वे वर्ष आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यात मर्यादा आल्या आहेत. विजय तरुण मंडळातर्फे यंदा अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केलाय. गणेशोत्सवा साठी मंडप, सजावट, मिरवणूक, वाद्य यावर खर्च  न करता मंदिरात मूर्तीची स्थापना करीत गणेशोत्सवाचा निधी एका तरुणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी दिला. मंडळाने हे मदत कार्य हे शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या मार्गदर्शनाने केले. मयुरी सूर्यवंशी ही २१ वर्षीय तरुणी  ब्रेन ट्युमर आजाराने त्रस्त आहे. या  तरुणीच्या उपचारासाठी "विजय तरुण मंडळा" तर्फे एक लाख रुपयांचा धनादेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांच्या हस्ते तिच्या आईला सुपूर्द करण्यात आला. लहानपणीच मयुरीच्या वडिलांचे निधन झाले, आई घरकाम करून उदरनिर्वाह करत तिने मयुरीला उच्च शिक्षण दिले. मयूरीने एमबीए केलं आहे मात्र सहा महिन्यापूर्वी तिला ब्रेन ट्युमर या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले.
 सहा महिन्यापासून तीच्यावर उपचार सुरू असून मदत मिळाल्यानंतर तिच्या आईचे अश्रू अनावर झाले तिने मंडळाचे आभार मानले. यावेळी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, बाळा परब, भागवत बैसाणे आदींसह  विजय तरुण मंडळाचे हितचिंतक व कल्याण शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सवाचा निधी तरुणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिये साठी कल्याणच्या विजय तरुण मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी गणेशोत्सवाचा निधी तरुणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिये साठी कल्याणच्या विजय तरुण मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी Reviewed by News1 Marathi on September 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads