Header AD

यमराज आणि गेस्ट शॉर्ट फिल्मला मोठं यश

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शिक्षक दिनाचे औचित्य साधून सलाम मुंबई फाउंडेशन द्वारा निवड झालेल्या ०५ व्हिडीओचे सादरीकरण आणि सत्कार समारंभ ऑनलाइन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. व्हिडीओ तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील १०४ शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन चांगले व्हिडीओ बनवून चांगला प्रतिसाद दाखवला यामध्ये ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा राहनाळ यांच्या  अजय पाटीलपदवीधर शिक्षकजि. प्राथ. शाळा राहनाळठाणे लिखित दिग्दर्शित यमराज लघुपटाला द्वितीय क्रमांक तर जिल्हा परिषद शाळा गोवे रवींद्र तरेसहा. शिक्षकजि. प्राथ. शाळा गोवेठाणे अभिनित गेस्ट शॉर्ट फिल्मला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पद्मजा जोगेवारसहसंचालकआरोग्य सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य) मा. डॉ. अजयकुमार लोळगे,  विशेषाधिकारी बालभारती पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (महाराष्ट्र राज्य) विशाल पाटीलसचिन जाधवनिवड समिती सदस्य उपस्थित होते.यमराज आणि गेस्ट शॉर्ट फिल्मचे लेखन दिग्दर्शन अजय यांचे आहे. या लघुपटांमध्ये रविंद्र तरेसुनिल पाटीलसाहिल कांबळेअजय पाटील तसेच बालकलाकार सिद्धी देसाई यांनी अभिनयाची छाप सोडली आहे. या लघुपटांना यश मिळाल्या बद्दल गटशिक्षणाधिकारी निलम पाटीलशिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वलेकेंद्र प्रमुख विजश्री गवळी यांनी शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिक्षकवर्गातून कौतुक केले जात आहे.


यमराज आणि गेस्ट शॉर्ट फिल्मला मोठं यश यमराज आणि गेस्ट शॉर्ट फिल्मला मोठं यश Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads