Header AD

दारू न दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  दारू न दिल्याच्या रागातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिम अहिल्याबाई चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाजार पेठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.. सुनील चौधरी, लुटो महलहार अशी या आरोपींची नावे आहेत. या दोन आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकात अजय रावत पायी जात असताना त्याला सुनील चौधरी, लुटो महलहार या दोघांनी हटकले. दोघांनी अजय जवळ दारूची मागणी केली. अजयने दारू देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या सुनील आणि लुटोने अजय याला लाथा बुक्क्यांनी, तीक्ष्ण हत्याराने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय गंभीर जखमी झाला होता. अजयला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. खबरींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीच्यां शोधा साठी एका बांधकाम साईट वर सापळा रचत अवघ्या ४८  तासात आरोपी सुनील चौधरी व लुटू मल्हार  या दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपीना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे, सहा पोलीस आयुक्त अनिल पोवार व व.पो.नि. यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. (गुन्हे) राजेंद्र अहिरेसपोनि सानपघोलपगुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार पोना गिरीष पवारबावीस्करबागुल यांनी अथक परिश्रम घेउन गुन्हा दाखल झाल्यापासुन १२ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून कौतुकास्पद व कौशल्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाचा पुढील तपास पो.नि. (गुन्हे) राजेंद्र अहिरे हे करीत आहेत.

दारू न दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक दारू न दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक Reviewed by News1 Marathi on September 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

श्री भगवान आदेश्वर चौकाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून सुशोभीकरण मुनिराज पुष्पेंद्र व मुनिराज रुपेंद्र यांच्या हस्ते लोकार्पण

कल्याण,  प्रतिनिधी  :  कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या श्री भ...

Post AD

home ads