Header AD

वसार व भाल मधील शेतकऱ्यांवर एमएमआरडीए कडून अन्याय


 

■बेकायदेशीर पद्धतीने डिफेन्सचे रिझर्वेशन टाकल्याचा नागरिकांचा आरोप...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : गेली ७० वर्ष वसार आणि भाल क्षेत्रातील शेतकरी ज्या ठिकाणी आपलं घर म्हणून राहत होते त्याच ठिकाणी अचानक पणे एमएमआरडीए कडून डिफेन्सचे बेकायदेशीर रिझर्वेशन टाकण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून यामुळे अनेक शेतकरी बेघर होणार आहेत.
या ठिकाणी काही ही बांधकाम करायचं असेल तर आता डिफेन्स ची परवानगी घ्यावी लागणार आहे. वास्तविक पाहता हे असे रिझर्वेशन कोणत्याही नियमात बसत नाही. डिफेन्स डिपार्टमेंट सदरची जागा नावावर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सदरची जागा कधीच एक्विझिशन आणि डीरीकविझिशन मध्ये नव्हती. परंतु फक्त जागा बळकावण्याचा दृष्टीने सदर प्रयत्न चालू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
 वसार मध्ये २०१७ मध्ये असाच एक २१७० नंबरचा फेरफार टाकून इतर अधिकारामध्ये नेवाळी एरोड्रम अशी नोंद टाकलेली आहे. सदर चे सातबारे डीरीकविझिशन मध्ये असताना देखील ती नोंद करण्यात आली होती. ती नोंद देखील लवकरात लवकर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सदरचा प्रकार उरलेल्या सातबाऱ्यांच्या बाबतीत होऊ नये हीच भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

 त्यामुळे सदर जमिनीचे व्यवहार देखील होत नाही. आज बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही दयनीय व हलाखीची आहे. परंतु सदर बेकायदेशीर नोंदीमुळे जागांचे व्यवहार होत नसल्यामुळे बिल्डर सुद्धा डिफेन्स बॉण्ड्री मध्ये सातबारा विकत घेत नसल्याने बरेच शेतकरी आर्थिक व मानसिक तणावात आहेत.
 त्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कुठल्याही शेतकऱ्याने उचलल्यास त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील असा इशारा जमीन बचाव आंदोलन समिती श्री मलंग गड विभाग यांनी दिला आहे. हे रिझर्वेशन तात्काळ दूर करावे अन्यथा मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल तसेच सातबारा डिफेन्स चे असतील त्यावर प्लान पास होतच नाही मग त्यासाठी इतर वडिलोपार्जित जागेची मालकी असलेल्या गरीब शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अशी विनंती करण्यात आलेली आहे.
तसेच १६ डिसेंबर ४८ व १ मार्च ५५ LAQ ३९७ मधील जमिनी देखील डीरीकविझिशन नुसार डिफेन्स च्या नावाने आहेत त्याचे सातबारे देखील शेतकऱ्यांच्या नावे करावेत. अन्यथा जन आक्रोशातून मोठे जन आंदोलन उभे राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उभा राहील असा इशारा जमीन बचाव आंदोलन समिती श्री मलंग गड विभागाचे चैनू जाधव आणि सहकारी यांनी शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारयांना दिला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी उल्हासनगर यांना देखील निवेदन देऊन याबाबत विनंती केली आहे.

वसार व भाल मधील शेतकऱ्यांवर एमएमआरडीए कडून अन्याय वसार व भाल मधील शेतकऱ्यांवर एमएमआरडीए कडून अन्याय Reviewed by News1 Marathi on September 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads