Header AD

म्हारळ येथील खड्डेमय रस्ता बनविण्यासाठी स्थानिकांचे उपोषण

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण माळशेज महामार्गा वरील म्हारळगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून म्हारळगाव थारवाणी बिल्डिंग ते ताबोर आश्रम कांबा पावशे पाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता बनविण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिकांनी उपोषण करत आंदोलन केले.   

या ठिकाणी रोज अपघात होत असतात,  स्थानिकानी सतत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तरीही कोणती ही कारवाई होत नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूरावमहेश देशमुखअश्विन भोईरविवेक गंभीरराव, योगेश देशमुखलक्ष्मण सुरोशी, निकेश पावशे, अशफ़ाक शेख आदींसह जीप मालक चालक संघटनारिक्शा संघटनाकल्याण मुरबाड महामार्ग प्रवासी यांनी एकदिवसीय उपोषणाचे अस्त्र उगारले

या आंदोलनात स्थानिक ग्रामपंचायत सदस्यग्रामस्थमनसे ग्रामीणमनसे उल्हासनगरआमदार कुमार आयलानीजीप चालक संघटनाअपंग आधार कल्याणकारी संघटना देखील सहभागी झाले होतेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जागेवर पोहोचत उपोषणकर्त्यांची समजूत काढत रस्ता बनविण्याचे आश्र्वासन दिले. 
रस्ता बनवण्याचे पत्यक्ष काम ७ ऑक्टोबरला सुरु होणार आहे, तत्पूर्वी जाण्यायेण्यासाठी डांबरीकरण केले पाहिजे, रस्त्याच्या बाजूकडील गवत काढणे, माळशेज मुरबाड मार्गे मुंबई भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रायता पुलापासुन कल्याण बायपास रस्ता तयार करणे अशा अनेक मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. दरम्यान लवकर काम सुरु न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. 

म्हारळ येथील खड्डेमय रस्ता बनविण्यासाठी स्थानिकांचे उपोषण म्हारळ येथील खड्डेमय रस्ता बनविण्यासाठी स्थानिकांचे उपोषण Reviewed by News1 Marathi on September 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads