Header AD

साधे पणाने उत्सव साजरा करुन आनंद मिळवता येतो - उंबार्ली ग्रामस्थांचा आदर्श
डोंबिवली ( शंकर जाधव )  करोना मुळे सर्व सणांवर सावट असले तरी साधे पणाने उत्सव साजरा करुन आनंद मिळवता येतो.असा आदर्श डोंबिवली येथील उंबार्ली गावाने उभा केला आहे.कावळ्याचे गाव आणि  सजावटी साठी प्रसिद्ध असलेल्या या गावाने साधेपणाने उत्सव साजरा करण्यातून आनंद मिळण्याचे उदाहरण इतर गावांसमोर ठेवले आहे.


         
                 उंबार्ली गावाने आपला ग्रामीण लुक तसाचं ठेवला आहे.गावात प्रवेश केला कि, आजुबाजूला हिरवीगार डोलणारी भातशेती ,रस्त्याच्या दुतर्फा चिकु, आंब्याच्या बागा , अळुची शेती नजरेत भरते.उंबार्ली ने पर्यावरण संतुलन योग्य ठेवल्याने येथे कायम कावळ्यांचे वास्तव्य असते.गावातील अनेक ग्रामस्थांकडे गाई म्हशी असे पशूधन आहे.पुर्वी अनंत चतुर्थीला गणपती च्या सजावटीसाठी महिनाभर अगोदर तयारी सुरू व्हायची.
                 घराची मुख्य जागा थर्माकोल च्या आकर्षक सजावटीने देखणी स्वरूप धारण करीत असे. परंतु थर्मोकोलवर बंदी आली ,त्यांनतर ग्रामस्थांनी पारंपरिक पध्दतीने आरास करण्यास सुरुवात केली.
गावात बांबुची लागवड केली जाते. याचा उपयोग करुन आरास करण्यात येते.तर काही घरात कुत्रिम पाने फुले, नैसर्गिक साहित्यचा वपर आरास करण्यासाठी केला जातो.
  
            वास्तुविशारद, अभियंता, असे उच्चशिक्षित तरुण गावात असल्याने सजावट करताना पर्यावणाचे भान बाळगले जाते. गावात ९० घरात अनंत चतुर्थीला गणपती येतात.सणाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्र येउन उत्सव साजरा करणं महत्वाचं वाटतं.त्यामुळे संवाद साधता येतो.यासाठी गणेशोत्सव हे चांगले निमित्त आहे.
            गणपतीचा हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाउ शकतो आणि त्यातून आनंद मिळतो हे या करोना काळाने आपल्याला शिकवलं आहे.असे उंबार्लीचे शिवसेनेचे पदाधिकारी  सुखदेव पाटील यांनी सांगितले.

साधे पणाने उत्सव साजरा करुन आनंद मिळवता येतो - उंबार्ली ग्रामस्थांचा आदर्श साधे पणाने उत्सव साजरा करुन आनंद मिळवता येतो - उंबार्ली ग्रामस्थांचा आदर्श Reviewed by News1 Marathi on September 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads