Header AD

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या लोकाभिमुख कामांचा अभिमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या लोकाभिमुख कामांचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले कला मंदिरात विविध उपक्रमाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळयासमयी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले. कोविडच्या लाटेत सर्व जग ठप्प झाले आहेअसे वाटत असतांना महापालिका प्रशासनाने अनेक लोकोपयोगी कामे पूर्ण केली.             महापालिकेला सर्वोच्च असे कोविड इनोव्हेशन ॲवार्ड प्राप्त झाले आहेत्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करून त्यांनी महापालिकेच्या लोकाभिमुख  कामांचे  कौतुक केले.  ठाण्यातील घटना पाहता काही ठिकाणी कठोरतेने कायदे राबविणे आवश्यक असूनफेरीवाल्यांचा उच्छाद असेल तर तो आटोक्यात आणला पाहिजेअसेही ते पुढे म्हणाले.कोविडची तिसरी लाट येऊ नयेयाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोपर ब्रीजला नविन पॅरलल ब्रीज बनविण्यासाठी निधी एम.एम.आर.डी.ए. च्या माध्यमातून देऊ त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची उर्वरित कामे मार्गी लागतील याची ग्वाही घेत आहेअसे आश्वासक उद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात काढले.आवश्यक पायाभूत सुविधांचे लोकार्पण होणे ही महापालिकेच्या नागरिकांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कोविड कालावधीत कर्मचारी-अधिकारी यांनी सर्व संकटावर मात करुन कोविड लढयाला यशस्वी तोंड दिलं. कोविड कालावधीत जनतेसाठी केलेल्या कामाचे फलीत म्हणजेच महापालिकेला मिळालेले  कोविड इनोव्हेशन ॲवार्ड होययाचे सर्व श्रेय लोकप्रतिनिधीमहापालिका अधिकारी ,कर्मचारी ,सर्व वैदयकीय व इतर संघंटना आणि नागरीक यांचे आहेअसे मत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केले.या लोकार्पण सोहळया समयी कपिल पाटील-केंद्रीय राज्यमंत्रीपंचायती राजखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार रविंद्र चव्हाण यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमात कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केल्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पूलह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात उभारण्यात आलेला प्राणवायू निर्मिती प्रकल्पतसेच बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात उभारण्यात आलेला प्राणवायू निर्मिती प्रकल्पबाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर रुग्णालय येथे उभारण्यात आलेले अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहआय वार्ड व महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्रजैवविविधता उदयान-आंबिवलीतेजस्विनी बस व कल्याण-डोंबिवली शहर दर्शन बस तसेच टिटवाळा अग्निशमन केंद्र,मांडा या विविध उपक्रमांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन स्वरुपात करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव संजय जाधव यांनी केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या लोकाभिमुख कामांचा अभिमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या लोकाभिमुख कामांचा अभिमान  -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by News1 Marathi on September 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads