Header AD

एमजीद्वारे भारतातील पहिली वैयक्तिक एआय असिस्टंट एसयूव्ही 'अॅस्टर'चे अनावरण


 ■ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञानासह भारतातील पहिली एसयूव्ही ~


मुंबई, १५ सप्टेंबर २०२१ : एमजी मोटर इंडियाने वैयक्तिक एआय असिस्टंट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल ) तंत्रज्ञानासह भारतातील पहिली एसयूव्ही एमजी स्टर बाजारपेठेत दाखल केली. जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या झेडएसवर स्टर एमजी आधारित आहे. एमजी स्टर १९ सप्टेंबरपासून एमजी शोरूममध्ये दिसेल आणि त्यानंतर लवकरच बुकिंगला सुरुवात होईल.      

         सॉफ्ट-टच आणि प्रीमियम मटेरियलसह इंटिरिअर सुबक कलाकुसरीने तयार केले गेले आहे. हे दोन इंजिन पर्यायांमध्ये येणार आहेत - ब्रिट डायनॅमिक २२० टर्बो पेट्रोल इंजिन ज्यात ६-स्पीड एटी आहे जे तब्बल २२० एनएम टॉर्क आणि १४० पीएस पॉवर देते आणि दुसरे - मॅन्युअल ट्रान्समिशनसह व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन आणि ८-स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क आणि ११० पीएस पॉवर देते.    एमजी स्टरच्या वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये मानवासारख्या भावना आणि आवाजाची वैशिष्ट्ये जोडली आहेत. पॅरालिम्पिक थलिट दीपा मलिकने वैयक्तिक एआय सहाय्यकाला आपला आवाज दिला आहे, ज्याद्वारे हा अनुभव वैयक्तिक पातळीवर सुलभ होईल. स्टरमधील एआय तंत्रज्ञान एमजीच्या संभाव्यतेच्या कार-एज-ए-प्लॅटफॉर्म (सीएएपी) च्या दृष्टीकोनाभोवती विकसित केले गेले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार सेवा अंगीकृत करणे शक्य होईल.
      एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, "आम्ही आमच्या एसयूव्हीसह भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये अनेकदा उद्योगात प्रथम सादरीकरण केले आहेत. यावेळी आमच्याकडे वैयक्तिक एआय सहाय्यकासह ऑटोनॉमस लेव्हल २, एमजी स्टर आहे. त्याचे सुंदर बाह्य भाग, आलिशान इंटिरिअर आणि भविष्यातील तंत्रज्ञानामुळे, आम्हाला विश्वास आहे की स्टर हे एक परिपूर्ण पॅकेज आहे जे ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले."एमजीने एस्टरमधील एडीएएस (प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम) साठी बॉशबरोबर भागीदारी केली आहे. एआय तंत्रज्ञान, सहा रडार आणि पाच कॅमेरे एसयूव्हीला १४ प्रगत ऑटोनॉमस लेव्हल २ वैशिष्ट्ये व्यवस्थापित करण्यासाठी सुसज्ज करतात. ही कार ईएसपी, टीसीएस आणि एचडीसी सारख्या २७ मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित करते. त्याच्या आराम, सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ६ एअरबॅग्स, ६-वे पॉवर-डजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, गरम ओआरव्हीएम, रेन-सेन्सिंग वायपर, पीएम २.५ फिल्टर, पॅनोरॅमिक स्काय रूफ, रिअर एसी व्हेंट आणि फ्रंट आणि रिअर आर्मरेस्ट, १०.१ इंच एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ७ इंच एम्बेडेड एलसीडी स्क्रीनसह पूर्ण डिजिटल क्लस्टर यांचा समावेश आहे.एस्टरमध्ये एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञानावरील ८०+ इंटरनेट वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या वर, सीएएपी (कार एज ए प्लॅटफॉर्म) आहे, एमजी स्टर सबस्क्रिप्शन आणि सेवा आयोजित करते, ज्यात मॅपमायइंडियासह नकाशे आणि नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, कोयनेर्थ द्वारे अशा प्रकारचे पहिले ब्लॉकचेन-संरक्षित वाहन डिजिटल पासपोर्ट आणि बरेच काही समाविष्ट आहे. एमजी कार मालकांना जिओसाव्हन पवर संगीताची मैफल रंगविता येईल, तसेच हेड युनिटद्वारे पार्किंग स्लॉट सर्व्ह करण्याचे या प्रकारातील-पहिले वैशिष्ट्य अनुभवता येईल (पार्क+द्वारे संचालित, सुरुवातीस निवडक शहरे) आणि विकिपीडियासह माहितीच्या खजिन्यात अमर्याद भटकता येईल.एमजीच्या भावनिक चलनशक्तीच्या तत्त्वज्ञानाशी निगडित स्टरची समकालीन शैली ग्राहकांना आपलेसे करेल. यात एक प्रख्यात बोल्ड सेलेस्टियल ग्रिल आहे जो रस्त्यावर एक ठोस छाप पाडतो. एसयूव्ही ने क्लासिक लेपर्ड जंप शोल्डर लाईनसह एक मनमोहक आणि कृतीशील भूमिका बिंबवली आहे. एलईडी हेडलॅम्प्समधील स्टरचे नऊ क्रिस्टल डायमंड घटक अचूक तपशीलांसह त्याला एक स्पष्ट प्रकाशझोत देतात.ब्रिटनमधील लंडन येथील एमजीच्या ग्लोबल डिझाइन सेंटरचे प्रगत डिझाइन संचालक कार्ल गॉथम यांनी स्टरबद्दल सांगितले, "भावनिक चलनशक्ती ही संकल्पना स्टरला प्रीमियम फील आणते. अपवादात्मक पातळीच्या तपशीलासह उल्लेखनीय वैशिष्ट्यांमुळे ही मिड-साइज एसयूव्ही डोळ्यांचे पारणे फेडते. कार तयार करताना आम्ही डिझाइन केंद्रस्थानी ठेवले. जेणेकरून ती त्याच्या तंत्रज्ञानाइतकी चपखल दिसेल. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइन उत्कृष्टतेसह एमजीच्या ब्रँडचा वारसा पुढे नेते. वैयक्तिक एआय सहाय्यासह एमजी स्टर भारतीयांना सुलभ ड्रायव्हिंगचा अनुभव देईल."

एमजीद्वारे भारतातील पहिली वैयक्तिक एआय असिस्टंट एसयूव्ही 'अॅस्टर'चे अनावरण एमजीद्वारे भारतातील पहिली वैयक्तिक एआय असिस्टंट एसयूव्ही 'अॅस्टर'चे अनावरण Reviewed by News1 Marathi on September 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads