Header AD

पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वॉड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ...■वॉडबॉय दारू पिऊन इमर्जन्सी वॉडमध्ये झोपल्याचा आरोप.. सामाजिक माध्यमात व्हिडिओ व्हायरल..डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेचे डोंबिवलीतील पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयात वॉडबॉयने रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी रात्री रुग्णालयातील इमर्जनसी वॉडमध्ये घडली.

                यावेळी डॉक्टरांनी मध्यस्थी घेत वातावरण चिघळणार नाही याची काळजी घेत एकप्रकारे वॉड बॉयला वाचवण्याचा प्रयत्न केला.तर वॉडबॉय दारू पिऊन इमर्जन्सी वॉडमध्ये झोपला असताना त्याला उठवल्याने त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे.याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला आहे.
                 रिपब्लिकन सेनेचे कल्याण - डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आनंद नवसागरे हे शुक्रवारी वडिलांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना घेऊन  शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन गेले.रुग्णालयाच्या तळमजल्यावर ईमर्जन्सी वॉडमध्ये नवसागरे गेले असता तिथे बेडवर एक वॉडबॉय झोपल्याचे पाहिले. वडिलांवर लवकर उपचार सुरू होणे आवश्यक असल्याने त्यांनी झोपलेल्या वॉड बॉयला उठवले.रुग्णाची सेवा करण्याऐवजी हा वॉडबॉय दारू पिऊन झोपा काढत असल्याने नवसागरे यांनी त्याला जाब विचारला.   
             परंतु माफी मागण्या ऐवजी  वॉडने नवसागरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.तर बाजूकडील एका खोलीत नर्स देखील    आराम करत असल्याचे नवसागरे यांनी पाहिले.वॉडबॉय नवसागरे यांच्याशी मोठ्या आवाजात वाद घालत असल्याचे ऐकून डॉक्टर इमर्जन्सी वॉडमध्ये धावते आले.दारुच्या नशेत तराट असलेल्या वॉडबॉयने नवसागरे यांना शिवीगाळ केली.हा सर्व प्रकार नवसागरे यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.
             रुग्णालयात दारू पिऊन धिंगाणा घालणारा वॉडबॉय कोविड काळात तात्पुत्या सेवेसाठी पालिका प्रशासनाने कामावर रुजू केला होता.मात्र मस्ती चढलेल्या या वॉडबॉयने ड्युटीवर असताना दारू पिऊन रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ केल्याने या वॉड बॉयला तात्काळ सेवेतुन काढून टाकण्यात यावे अशी मागणी नवसागरे यांनी केली आहे.
           दरम्यान हा वॉडबॉयने कोविड काळात गरीब रुग्णांच्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांची आर्थिक लूट केली तसेच डेडबॉडी बांधण्यासाठी हजार ते दोन हजार रुपये उळल्याचा आरोप होत आहे.
पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वॉड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ... पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वॉड बॉयची  रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ... Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads