Header AD

ठाणे कोपरी रेल्वे पुलाची खा. राजन विचारे यांच्या कडून पाहणी
ठाणे,  प्रतिनिधी  : -  ऐन गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी हायवे पूर्व द्रुतगतीमहामार्गावरील कोपरी रेल्वे येथे अरुंद पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. हा त्रास कमी व्हावा व या पुलाचे काम लवकरातलवकर मार्गी लागावे यासाठी खासदार राजन विचारे यांनी आज या पुलाच्या कामासंदर्भात असणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत पाहणी दौरा आयोजित केला होता.त्या पाहणी दौऱ्यात उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, स्थानिक नगरसेविका मालती रमाकांत पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला गायकवाड, किरण नाकती तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अभियंता सुर्वे, रेल्वेचे व्यवस्थापकीय अधिकारी, सल्लागार तसेच ठेकेदार तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाहणी करण्यापूर्वी खासदार राजन विचारे यांनी सर्व कामांचा आढावा उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई व ठाण्याच्या दिशेस असणाऱ्या लेनचे काम एमएमआरडीए मार्फत सुरू आहे. व रेल्वे पुलावरील काम रेल्वे मार्फत सुरू आहे.मुंबईच्या दिशेने जाण्याऱ्या पुलाचे ओक्टोंबर च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कॉंक्रीट चे काम पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज करण्यात येणार आहे. दि. २० जुलै २०२१ पालघर येथील भोईसर येथे गर्डर च्या कामाची पाहणी करण्यात आली होती. 


तेथील सर्व गर्डर कोपरी येथे आणण्यात आलेले आहेत व पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित गर्डर बसविण्याचे काम येत्या ९ महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वर्षभरात या ब्रिजचे काम पूर्ण करून याचा लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.


ठाणे कोपरी रेल्वे पुलाची खा. राजन विचारे यांच्या कडून पाहणी ठाणे कोपरी रेल्वे पुलाची खा. राजन विचारे यांच्या कडून पाहणी Reviewed by News1 Marathi on September 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads