Header AD

राजेश कदम यांची शिवसेना कल्याण डोंबिवली क्षेत्राच्या उपजिल्हा प्रमुख पदावर नेमणूक





डोंबिवली (  शंकर जाधव ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली क्षेत्राच्या उपजिल्हा प्रमुख ह्या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. 




            या प्रमुख पदावर नेमणूक केल्याबद्दल राजेश कदम यांनी समस्त शिवसेना परिवाराचे मनापासून आभार मानले असून या पदाला मी योग्य न्याय देऊन डोंबिवली शहरासाठी  नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत कष्ट घेईन असे वक्तव्य केले आहे. कदम यांची उपजिल्हा  प्रमुख पदी नेमणूक झाल्याने त्याचे शहरात अभिनंदन होत आहे.
राजेश कदम यांची शिवसेना कल्याण डोंबिवली क्षेत्राच्या उपजिल्हा प्रमुख पदावर नेमणूक राजेश कदम यांची शिवसेना कल्याण डोंबिवली क्षेत्राच्या उपजिल्हा प्रमुख पदावर नेमणूक Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads