Header AD

कल्याण पूर्वेतील मोनालीसा बार वर कल्याण गुन्हे शाखेची कारवाई पोलिसांनी घेतले ५६ जणांना ताब्यात




कल्याण , कुणाल  म्हात्रे : कल्याण पूर्वेतील मलंगगड रोडवर मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या मोनालीस बार वर कल्याण गुन्हे शाखा -३ ने कारवाई करत २१ महिला, ५ वेटर व ३० ग्राहकांना पोलिसांनी तांब्यात घेत ७८ हजार किंमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. मलंगगड रोडवर असलेल्या मोनालीसा बार वर ग्राहकांना सर्व्हिस देण्याकरता तोकड्या कपड्यातील महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील कृत्य व हावभाव करत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली. 



         या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस नाईक अजित राजपूत यांच्या पथकाने मोनालीसा बार वर छापा टाकत कारवाई केली. यात २१ महिला,५ वेटर सह ३० ग्राहकांना ताब्यात घेत पुढील कारवाई साठी मानपाडा पोलीस स्टेशन कडे देण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी दिली.

कल्याण पूर्वेतील मोनालीसा बार वर कल्याण गुन्हे शाखेची कारवाई पोलिसांनी घेतले ५६ जणांना ताब्यात कल्याण पूर्वेतील मोनालीसा बार वर कल्याण गुन्हे शाखेची कारवाई पोलिसांनी घेतले ५६ जणांना ताब्यात Reviewed by News1 Marathi on September 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads