Header AD

बांधकाम पूर्ण होण्या पूर्वीच धोकादायक झाला मुंब्रा उड्डाण पूल विरोधी पक्षनेत्यांच्या पाहणी दौर्‍यात उघडकीस आले सत्य


■सुरक्षा साधनांची वानवा अनेक ठिकाणी पुलाला तडे कोटींग शिवाय सळईंचा वापर....


ठाणे (प्रतिनिधी) - मुंब्रा- शिळ-कल्याण आणि ऐरोलीला जोडणार्‍या उड्डाणपुलाचे बांधकाम 50 टक्क्यांच्या आसपास पूर्ण होत आलेले आहे. मात्र, आताच हा पूल धोकादायक झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तसेच शहाराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केलेल्या पाहणी दौर्‍यामध्ये ही बाब उघडकीस आली आहे.         मुंब्रा- शिळ-कल्याण आणि ऐरोलीला परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्याच्या उद्देशाने मुंब्रा वाय जंक्शन येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामाची शानू पठाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खाामकर, साकिब दाते यांनी पाहणी केली. या पाहणीमध्ये या पुलाच्या निकृष्ठ कामाचाा प्रकार उघडकीस आला.        या पुलाच्या बांधकामात वापरण्यात येत असलेल्या सळई अत्यंत कमकुवत असून त्यांना रसायनांचा लेप लावला जात नाही. त्यामुळे या सळईंना गंज लागून त्या आतच तुटण्याची शक्यता आहे त्याशिवाय, वापरण्यात आलेले बांधकाम साहित्यही अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याने हा पूल पूर्ण होण्याआधीच धोकादायक झाला आहे. याा पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे नुकतीच मुंबईत जशी पूल कोसळण्याची घटना घडली आहे. तशी घटना येथेही घडण्याची दाट शक्यता असल्याचे शानू पठाण यांनी सांगितले.        आज सकाळीच शानू पठाण यांनी हा दौरा केला. त्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, आज जर बांधकाम सुरु होत असतानाच पुलाची अशी अवस्था असेल तर हा पूल दहा वर्षे तरी टिकेल का? या पुलावरुन अवजड वाहतूक होणार आहे. मात्र, स्वत:च्या फायद्यासाठी ठेकेदाराने जाणीवपूर्वक निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे. या संदर्भात आपण एमएमआयडीए, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लेखी तक्रार करुन असून  एसएनसी या ठेकेदारावर कारवाई  करण्याची मागणी करणार आहोत, असेही ते म्हणाले.

बांधकाम पूर्ण होण्या पूर्वीच धोकादायक झाला मुंब्रा उड्डाण पूल विरोधी पक्षनेत्यांच्या पाहणी दौर्‍यात उघडकीस आले सत्य बांधकाम पूर्ण होण्या पूर्वीच धोकादायक झाला मुंब्रा उड्डाण पूल विरोधी पक्षनेत्यांच्या पाहणी दौर्‍यात उघडकीस आले सत्य Reviewed by News1 Marathi on September 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads