Header AD

कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडीवर "स्वराज्य ध्वजाचे" जल्लोषात स्वागत
कल्याण , प्रतिनिधी  : -   कल्याणातील दुर्गाडी किल्ल्यावर   राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे मगंळवारी दुपारी  आगमन झाले. दुर्गाडी किल्ल्यावर या ध्वजाचे स्थानिक राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पूजन केले. यावेळी विविध घोषणांनी दुर्गाडी किल्ला परिसर दुमदुमला हाेता.
           ही ध्वज यात्रा कर्जतहून सुरू झाली असून, देशातील सहा राज्यांमधून १२,००० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये जाणार असून, या दरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक स्थळे, स्मारके अशा ऊर्जा केंद्रे असलेल्या ७४ ठिकाणी स्वराज्य ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन केले जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी या यात्रेची सांगता होणार आहे. या ध्वजासोबत , ऋषिकेश करभाजन, आणि सहकारी या ध्वजासोबत जिल्ह्यांमधून फिरत आहेत.              
            कल्याणातील दुर्गाडी  किल्यावर या ध्वजाचे आगमन झाल्यानंतर ध्वजाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे,सुभाष गायकवाड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वक्ता विभाग,सुधीर पाटील युवक जिल्हा   अध्यक्ष, रमेश हनुमंते प्रदेश सरचिटणीस.,  सुजीत रोकडे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष,सारीका गायकवाड महिला जिल्हा अध्यक्ष,अर्जुन नायर कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष,शरद गवळी कल्याण पूर्व विधानसभा कार्यध्यक्ष, युवक काँग्रेस कल्याण पश्चिम विधान सभा अध्यक्ष योगेश माळी, सुरेश जोशी डोंबिवली विधानसभा  आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडीवर "स्वराज्य ध्वजाचे" जल्लोषात स्वागत कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडीवर  "स्वराज्य ध्वजाचे" जल्लोषात स्वागत    Reviewed by News1 Marathi on September 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन - प्रा.देविदास मुळे

■सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.... कल्याण, कुणाल म्हात्रे  :  मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन...

Post AD

home ads