Header AD

५ सप्टेंबर सलोनी तोडकरिचा वाढदिवस गणाईचा बालदिन म्हणून साजरा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : चिरंजीवी संघटना ही गेल्या ९ वर्षांपासून  बालकांच्या अधिकारांवर कार्यरत असून बालभीकारी, बालमजुरीबाल लैंगिक शिक्षणबालविवाहबाल शिक्षण अश्या अनेक प्रश्नांवर सातत्याने अहिंसक मार्गाने लढा देत आली आहे. हा लढा गणाई परिवारातील सलोनी तोडकरी  जी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षांपासून इतक्या लहान वयातही कळकळीने व तळमळीने ह्या कार्यात स्वतः ला झोकून काम करत आहे. अशा या सलोनी तोडकरिचा वाढदिवस गणाईचा बालदिन म्हणून रविवारी साजरा करण्यात आला.वयाच्या १६ व्या वर्षी 'बचपन बचाओ मानवता बचाओह्या मोहिमेला तीने सुरुवात  केली. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या विभागात जाऊन एक दिवसीय उपोषण करत त्या त्या विभातात पथनाट्यलहान मुलांचे खेळांच्या माध्यमातून अभ्यास घेणंविविध प्रकारचे व्याख्यान आयोजित करणं,  मोफत वार्षिक शिबिरं आयोजित करणंफटाके मुक्त दिवाळी साजरी व्हावी यासाठी गावागावात - शाळाशाळांत जनजागृती करणं असे एकूण ८७ उपोषण सलोनी हिने केले आहेत. ही व अशी अनेक कामं सलोनी तोडकरी ही वयाच्या १४ व्या वर्षांपासून करत आहे. अनेक पुरस्कारांनी तिचा सन्मान झाला असून राज्यपालांच्या हस्ते ही तिला गौरविण्यात आले आहे. तसेच युनिसेफ सारख्या जागतिक पातळीवरील मासिकात सलोनी तोडकरी हिच्या कार्याचा उल्लेख असल्याची माहिती चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय सचिव  श्वेता पाटील यांनी दिली.इतक्या लहान वयात बालकांबद्दल जाणीवपूर्वक तळमळीने काम करत असणाऱ्या सलोनीचा ५ सप्टेंबर  रोजी तिचा वाढदिवस हा बालदिन म्हणून कल्याण मधील लोणाड वस्ती, बापगाव वाडीउंबर्डे गाव व रायगड मधील माणगावयेरद वस्तीथरमरी वाडी व विरार विभागावातील भाटपाडा पुण्यातील दिवळे गावात अश्या अनेक विभागात लहान मुलांचे खेळ घेऊन, गाणं गातशैक्षणिक साहित्य वाटपकपडे वाटप करून साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्रवक्ता रामचंद्र धुरी यांनी दिली.

५ सप्टेंबर सलोनी तोडकरिचा वाढदिवस गणाईचा बालदिन म्हणून साजरा ५ सप्टेंबर सलोनी तोडकरिचा वाढदिवस गणाईचा बालदिन म्हणून साजरा Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads