Header AD

कल्याण मध्ये शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडार सेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केडीएमसी निवडणुकी आधी वातावरण तापले
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या आधी येथील राजकीय वातवरण चांगलेच तापले असून ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली  कल्याण मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडार पडली आहे. या आधी देखील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.


      राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये या महाविकास आघाडीत केडीएमसी निवडणुकीच्या आधी फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण हि तसेच असून शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख दीपक काळे व त्यांचे पंचवीस सहकारी पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी देखील आगामी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढविण्याचे भाष्य केलेत्यांच्या या वक्तव्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील सहमती दर्शविल्याने केडीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडी मधून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा काडीमोड निश्चित मानला जात आहे.राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटीलगृहनिर्माण मंत्री तथा ठाणे जिल्हा संपर्क मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्माराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहानराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणेराष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई अध्यक्ष आदिती नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते कल्याण पश्चिम विधानसभा येथील शिवसेनेच्या माजी विभाग प्रमुख दीपक काळे व त्यांचे पंचवीस सहकारी पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कल्याण शहर अध्यक्ष निखिल कदम यांच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी दिली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांच्या प्रेरणेने शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी  राष्ट्रवादीत प्रवेश केला असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्या ताकतीने उभा राहील. कल्याण-डोंबिवली येथे पक्षसंघटन मजबूत होईल यात तिळमात्र शंका नसल्याचे शिखरे यांनी सांगितले. यावेळी कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष सुजित रोकडेजिल्हा कॉर्डिनेटर सुजित पवारजिल्हा सरचिटणीस जयेश भोईरशहर सचिव तिजो क्रिश्चन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण मध्ये शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडार सेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केडीएमसी निवडणुकी आधी वातावरण तापले कल्याण मध्ये शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडार सेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केडीएमसी निवडणुकी आधी वातावरण तापले Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads