Header AD

ठाणेकर शितल खरटमल यांना मध्यप्रदेश सरकारचा भारत भूषण पुरस्कार जाहीरठाणे (प्रतिनिधी)  -  महाराष्ट्र पोलीस दलातील शितल खरटमल यांना मध्यप्रदेश सरकारचा भारतभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणार्‍या त्या सबंध महाराष्ट्रातील त्या एकमेव महिला पोलीस आहेत.        29 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या खरटमल यांना ऑक्टोबरमध्ये पुरस्कार प्रदाान करण्यात येणार आहे. कळवा येथील रहिवासी असलेल्या शीतलने ज्युडो, मार्शल आर्टमअधील प्राविण्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शितल  सध्या ठाणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेत पोलीस हवालदार म्हणून तैनात आहे.        2003 मध्ये, शितल हिने प्रशिक्षक मधुकर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट-जुडो खेळाचा सराव सुरू केला. आजपर्यंत त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या खेळांमध्ये सुमारे 56 सुवर्णपदके, 11 रौप्य आणि 9 कांस्य पदके पटकावली आहेत.         सोलापूर येथील शीतलने राज्यशास्त्रातून बीए पूर्ण केले आहे. तिने पटियाला संस्थेतून जुडोमध्ये डिप्लोमा केला आहे.  आपल्या या यशाचे  श्रेय शितलने आपल्या आईला दिले आहे.

ठाणेकर शितल खरटमल यांना मध्यप्रदेश सरकारचा भारत भूषण पुरस्कार जाहीर ठाणेकर शितल खरटमल यांना मध्यप्रदेश सरकारचा भारत भूषण पुरस्कार जाहीर Reviewed by News1 Marathi on September 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads