Header AD

शहरात साथरोग उद्भवू नये यासाठी विविध ठिकाणी धूर व औषध फवारणी


■ठाणे महापालिकेच्यावतीने प्रभाग समितीमध्ये धूर,औषध फवारणी करताना महापालिका कर्मचारी.....


ठाणे , प्रतिनिधी : शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत धूर, औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर व औषध फवारणी सुरु आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जावून पाण्याची तपासणी करण्यात येत आहे.


    

          ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये माहे ऑगस्ट २०२१ मध्ये डेंग्युचे संशयित रुग्णसंख्या २७ आणि निश्चित निदान केलेले ०१ रुग्णसंख्या आहे. तसेच मलेरियाचे माहे ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त ७६ रुग्ण आढळुन आले होते. आरोग्य विभागाच्यावतीने शहरात गृहभेटी देवून तपासणी करण्यात येत असून एकुण ५१,५६१ घरांची तपासणी करण्यात आली.          त्यापैकी १,४९६ घरे दुषित आढळुन आली. तसेच एकुण ७६,९१२ कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी १,५६७  कंटेनर दूषित आढळुन आले. या ४९७दुषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले. तर ९८८ दूषित कंटेनर रिकामे करून काही कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.         दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ६ ईरिक्षा, ८ बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात १,७६६ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी हॅण्डमशीनव्दारे १०,२९४ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.

शहरात साथरोग उद्भवू नये यासाठी विविध ठिकाणी धूर व औषध फवारणी शहरात साथरोग उद्भवू नये यासाठी विविध ठिकाणी धूर व औषध फवारणी Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads