Header AD

शिवसेनेची भिवंडी ट्राफीक कार्यालयावर धडक!, शिवसेना आक्रमक, ACP माने-पाटील यांच्याशी केली चर्चा..

भिवंडी दि 3 (प्रतिनिधी ) शहरात वाहतूक कोंडीने नागरीकांचा जीव जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शहरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते यासाठी संशोधन करावे लागेल इतके ते खराब झाले आहेत. त्यामुळे चाकरमनी, ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांना रस्त्यावर चालणे जिकरीचे झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांना वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरतचा करावी लागत आहे.
           त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्याचे पर्यावसन लोकांच्या मानसिकतेवर होत असुन घरी गेल्यानंतर माणसाची चिडचिड होऊ लागली आहे. *म्हणून शिवसेना भिवंडी शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख श्री. सुभाषजी माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज भिवंडी वाहतूक शाखेवर धडक देऊन सहाय्यक पोलिस आयुक्त माने-पाटील साहेब यांच्याशी भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चर्चा केली.
                भिवंडी शहरात वंजारपट्टी नाका, एस.टी.स्टॅण्ड, हसिन टाॅकीज, स्व.आनंद दिघे चौक (जुना जकात नाका), कल्याण नाका, धामणकर नाका, अंजुरफाटा, मंडई, नझराना टाॅकीज, तीन बत्ती अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे सर्व नागरिक यामुळे त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे जरी ट्राफिक होत असली तरी वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. 


  
                 यावर मार्ग काढण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री. सुभाषजी माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ वाहतुकीचे सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) श्री. माने-पाटील साहेब यांना भेटले. यावेळी झालेल्या बैठकीत अंजुरफाटा, नारपोली, धा.नाका,  जकात नाका, वंजारपट्टी नाका येथे कशाप्रकारे नियोजन केल्यास वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका होईल याची प्लानिंग सांगण्यात आली. तसेच अंजुरफाटा ते धामणकर नाका येथे सध्या मेट्रोचे काम बंद आहे तरीही रस्त्याच्या दुतर्फा पत्राशेड लावल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.              त्यामुळे ते तात्काळ काढून टाकण्यात यावे अन्यथा शिवसेना ते पत्रे उखडून फेकुन देतील असा इशारा देण्यात आला.* अवजड वाहने शहरात प्रवेश केल्यानेही वाहतूक कोंडी होते. त्यावरही सोल्युशन देण्यात आले. रिक्षा ड्राइव्हरच्या बेजबावदारपणामुळेही ट्राफीक होत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना शिस्त कशी लावता येईल याविषयीही चर्चा करण्यात आली.                 पुढील सप्ताहात गणेशोत्सव साजरा होणार असून बाजारपेठ, मंडई, पद्मानगर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त जमा होत असतात. शिवाय महिलाही खरेदीसाठी बाजारात जात असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाट ठेवावा असेही सुचविण्यात आले आहे. 

             एकूणच सर्व विषयांवर सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) श्री. माने-पाटील साहेब सकारात्मक असून शिवसेनेने सुचविलेल्या सुचना विचारात घेऊन भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल असे आश्वासन देण्यात आले आणि लगेच त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आदेशही देण्यात आले आहेत.
             शिवसेनेच्या या धडाकेबाज धडकेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळात महानगरप्रमुख श्री. श्याम पाटील, शहर सचिव श्री. महेंद्र कुंभारे, विधानसभा संघटक (पूर्व-पश्चिम) श्री. दिलीप नाईक आणि श्री. मदन भोई, विधानसभा सचिव (पूर्व-पश्चिम) श्री. गोकुळ कदम आणि श्री. दिलीप कोंडलेकर , उपशहरप्रमुख श्री. संजय काबुकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 
शिवसेनेची भिवंडी ट्राफीक कार्यालयावर धडक!, शिवसेना आक्रमक, ACP माने-पाटील यांच्याशी केली चर्चा.. शिवसेनेची भिवंडी ट्राफीक कार्यालयावर धडक!, शिवसेना आक्रमक, ACP माने-पाटील यांच्याशी केली चर्चा.. Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads