Header AD

मोदींच्या ‘प्रयासाने’ गॅस सिलिंडरचे दर 900 रुपयांच्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेसने मानले मोदींचे शाल जोडीतून निषेधठाणे (प्रतिनिधी)  - सन 2014 मध्ये 410 रुपये असलेले घरगुती गॅस सिलिंडरचे दर आता 889.50 रुपयांवर गेले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणार्‍या मोदी यांनी आता ‘सबका प्रयास’ असा नवा नारादेखील दिला आहे. मात्र, त्यांच्याच प्रयासामुळे गॅस सिलिंडरचे दर आता 900 रुपयांच्या आसपास गेले आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  सबंध ठाणे शहरात “ धन्यवाद, आदरणिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी” असा संदेश देणारे फलक लावले आहेत.           सन 2014 मध्ये देशात घरगुती सिलिंडरचे दर 410 रुपये होते. आता हेच दर 889.50 रुपयांवर गेले आहेत. एकीकडे गणेशोत्सव तोंडावर असतानाच गॅसचे दर वाढल्याने सामान्य जणांचे कंबरडे मोडले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे अनोखे फलक लावून दरवाढीबद्दल चक्क मोदींचेच आभार मानले आहेत.           या संदर्भात शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांनी, ”राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण शहरभर आदरणिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद करणारे बॅनर आम्ही लावलेले आहेत. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यावेळी 1 एप्रिल 2014 रोजी घरगुती गॅसचा भाव हा 410 रुपये होता आणि 1 सप्टेंबर 2021 रोजी त्याच सिलिंडरचा भाव हा 889.50 रुपये झाला आहे. सबका साथ, सबका विकास आणि आता सबका प्रयास म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे कधीच महागाईवर बोलत नाहीत; वाढलेल्या इंधन दरवाढीवर बोलत नाहीत; बेरोजगारीवर बोलत नाहीत.           कोरोनाच्या काळात लसीकरणाचा  जो घोळ झाला आहे. तो केंद्रामुळे झाला. त्याच्यावर बोलत नाहीत. मात्र. दरमहा गॅस सिलिंडरचा दर वाढत आहे. आता तर केंद्राने अशी प्रणाली तयार केली आहे की पेट्रलियम कंपन्या दरमहिन्याच्या एक तारखेला किमंत वाढवणार आहेत.  शेवटची किमंत ही 17 ऑगस्टला झाली होती. आता पुन्हा 15 दिवसांनी घरगुती गॅसचे दर 25 रुपयांनी वाढविले आहेत.         मा. पंतप्रधानांना गरीब जनतेचे काहीही पडलेली नाही.  लवकरच गणरायाचे आगमन होत असताना गॅस दरवाढीची भेट आदरणिय पंतप्रधानांनी दिलेली आहे. म्हणूनच सबंध ठाणे शहरातील नागरिकांच्या वतीने मोदींचे आभार मानणारे बॅनर आम्ही लावलेले आहेत”, असे सांगितले.

मोदींच्या ‘प्रयासाने’ गॅस सिलिंडरचे दर 900 रुपयांच्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेसने मानले मोदींचे शाल जोडीतून निषेध मोदींच्या ‘प्रयासाने’ गॅस सिलिंडरचे दर 900 रुपयांच्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेसने मानले मोदींचे शाल जोडीतून निषेध Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads