Header AD

मासिक रेल्वे प्रवास पास घेण्यासाठी कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकात नोकरदार व चाकरमान्यांची गर्दी


■पहिल्या दिवशी २५०६ नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी..कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मासिक रेल्वे प्रवास पास घेण्यासाठी कल्याण डोंबिवली सह महापालिका हद्दीतील इतर  रेल्वे स्थानकात रेल्वेने नोकरी व्यवसायासाठी मुंबईकडे जाणार्या नोकरदार व चाकरमान्यांची रांगा लावल्या होत्या. मासिक रेल्वे प्रवास पाससाठी संबंधित कागद पत्रांची पडताळणी साठी केडीएमसीने रेल्वे स्थानकात मदत केंद सुरू केले आहेत.  आजच्या पहिल्या सत्रात महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवर एकुण २५०६ नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली.       शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविड लसीकरणाचे २ डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे. या नागरिकांना रेल्वे पास मिळणे सुकर व्हावे याकरीता त्यांच्या  कोविड लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरीता महापालिका कार्यक्षेत्रात,कल्याणडोंबिवलीकोपरटिटवाळाआंबीवलीशहाड,ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांवर महापालिकेने सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३  ते रात्री ११  या दोन सत्रात महापालिका कर्मचा-यांचे मदत कक्ष उभारण्यात आले आहेत.आज सकाळी ७  वाजता महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी हजर होते. या पहिल्या सत्रात कल्याण पूर्व रेल्वे स्थानक येथे १६८कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथे २८५डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक येथे ८२७डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक येथे ६०७ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर १९९शहाड रेल्वे स्थानकावर १५आंबिवली रेल्वे स्थानकावर ५१कोपर रेल्वे स्थानकावर १५०टिटवाळा रेल्वे स्थानकावर २०४ अशा एकुण २५०६ नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. दुपारच्या दुस-या सत्रातही नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. नागरिकांनी या पडताळणीसाठी गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

मासिक रेल्वे प्रवास पास घेण्यासाठी कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकात नोकरदार व चाकरमान्यांची गर्दी मासिक रेल्वे प्रवास पास घेण्यासाठी कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकात नोकरदार व चाकरमान्यांची गर्दी Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पत्रकार कुणाल म्हात्रे गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित

  ■होप मिरर फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात आला सन्मान कल्याण , प्रतिनिधी  :   नवी मुंबई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या होप मिरर...

Post AD

home ads