Header AD

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुस्तीच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट खासदारांच्या हस्ते मॅटचा शुभारंभ
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरातील जय बजरंग तालीम संघाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कुस्ती खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट दिली आहे. कल्याण मधील नांदीवली गावात असलेल्या जय बजरंग तालीम संघाने आजवर अनेक कुस्ती खेळाडू घडवले आहेत. आधी कुस्ती मातीत खेळली जात होती. आता वेळ आणि काळ बदलला असून स्पर्धा  वाढली आहे. त्यासाठी मॅट उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे  नांदवली गावचे माजी सरपंच रामदास ढोणे, पंढरीनाथ ढोणे यांनी व खेळाडूंनी केली होती. या मॅटचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी मुलांनी मॅटवर कुस्तीची प्रात्याक्षिके दाखविली. या मॅटवर उत्तम सराव करुन उत्तम खेळाडू घडतील. केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेर नाव कमाविण्यासाठी त्यांना उर्जा व प्रशिक्षण मिळेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच जय बजरंग तालीम संघाच्या व्यायाम शाळेच्या जागेत कुस्तीगीरांना आणि परिसरातील नागरिकांना नियमित व्यायामाकरिता लागणारे व्यायामशाळा साहित्य देखील उपलब्ध करुन दिले जाईलअशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.या लोकर्पण कार्यक्रमाप्रसंगी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, उल्हासनगर महापालिका गटनेता धनंजय बोडारेतालुकाप्रमुख अशोक म्हात्रेकल्याण पंचायत समिती माजी सभापती सदाशिव गायकरनगरसेवक महेश गायकवाडमारुती पाटीलविभागप्रमुख रामदास ढोणेमदन चिकणकरउपमहाराष्ट्र केसरी व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर युवराज वाघ  तसेच कल्याण व ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीर व वस्ताद उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुस्तीच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट खासदारांच्या हस्ते मॅटचा शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुस्तीच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट खासदारांच्या हस्ते मॅटचा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on August 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पत्रकार कुणाल म्हात्रे गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित

  ■होप मिरर फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात आला सन्मान कल्याण , प्रतिनिधी  :   नवी मुंबई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या होप मिरर...

Post AD

home ads