Header AD

नागरिकांच्या सोयीसाठी सर्वोदय सागर रिक्षा स्टॅण्डचे लोकार्पण


■रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाहतूक आघाडीचे प्रयत्न.....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील ईदगाह रोडवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीच्या वतीने सर्वोदय सागर रिक्षा स्टॅण्डचे लोकार्पण रविवारी करण्यात आले.             कल्याण पश्चिमेतील रहेजा कॉम्प्लेक्स समोरील गोविंद वाडी बायपास रस्त्यानजीक अनेक गृहसंकुले असून इतरही वस्तीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने राहत आहेत. येथील नागरिकांना प्रवासासाठी लवकर रिक्षा अथवा इतर वाहने उपलब्ध होत नसल्याने मोठी गैरसोय होत होती. त्याचप्रमाणे बाहेरून आलेल्या रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्यात येत होते. नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन वाहतूक आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी रिक्षा स्टॅण्ड सुरु करण्यात आला आहे.          या रिक्षा स्टॅण्डमुळे येथील नागरिकांना पाहिजे तेव्हा रिक्षा उपलब्ध होणार असून प्रवास करताना नागरिकांची होणार परवड आणि आर्थिक लुट देखील थांबणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांनी दिली. रविवारी या स्टॅण्डचे लोकार्पण करण्यात आले असून यावेळी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दलित मित्र अण्णा रोकडे, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोष लाड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा महिला आघाडी शीतल बनसोडे, नरेश कपूर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.                 दरम्यान यावेळी महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोष लाड यांच्याहस्ते साजिद महेमूद हसन चौधरी यांची वाहतूक आघाडीच्या कल्याण शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. येथील स्टॅण्डची जवाबदारी हि स्टॅण्डप्रमुख साबीर चौधरी, उप स्टॅण्ड प्रमुख मोबीन शेख, खजीनदार मुनाव्वर शेख, सल्लागार इम्ब्राहीम शेख आदी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. येथील नागरिकांना रिक्षा प्रवासाबाबत कोणतीही तक्रार असल्यास या पदाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांनी केले आहे. 

नागरिकांच्या सोयीसाठी सर्वोदय सागर रिक्षा स्टॅण्डचे लोकार्पण नागरिकांच्या सोयीसाठी सर्वोदय सागर रिक्षा स्टॅण्डचे लोकार्पण Reviewed by News1 Marathi on August 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विठ्ठलवाडी, घाटकोपर आणि नायगांव येथे आयोजित ३ रक्तदान शिबिरांमध्ये ३०९ निरंकारी भक्तांचे रक्तदान

कल्याण, कुणाल  म्हात्रे    :  संत निरंकारी मिशनची समाज कल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी विठ्ठलवाडी ,  घाटकोपर , ...

Post AD

home ads