Header AD

ठाणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचा अभिनव उपक्रम,रणरागिनींनी वृक्षारोपणाने केला स्वातंत्र्यदिन साजरा..
ठाणे , प्रतिनिधी  :  आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली.अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करताना अनेक राजकीय पक्ष,सामाजिक संघटनानी विविध उपक्रमाचे नियोजन करत असतात.           कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.हा महत्वपूर्ण विचार करून जिजाऊ ब्रिगेड ठाणे जिल्ह्याच्या वतीने वृक्षारोपणाचा अभिनव  समाजोपयोगी उपक्रम आयोजित केला होता. संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी सुमारे पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली. ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रा. एकताताई देशमुख  तसेच जिल्हा कार्याध्यक्षा तथा रायझिंग स्टार प्री- प्रायमरी स्कूलच्या संचालिका ममता मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेण्यात आला.             या उपक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या अनेक रणरागिनींनी सहभाग घेतला होता.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्षा देशमुख म्हणाल्या कि, मानवाला जगण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा आहेत परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळतो,ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असून या ठिकाणी स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते.            यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही. म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने पुढील काळात या विषयावर ठोस भूमिका घेतली जाईल. यावेळी ठाणे शहराध्यक्षा प्रतिभाताई शिर्के,शहर उपाध्यक्षा रंजनाताई शेडगे आदी पन्नास महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

ठाणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचा अभिनव उपक्रम,रणरागिनींनी वृक्षारोपणाने केला स्वातंत्र्यदिन साजरा.. ठाणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचा अभिनव उपक्रम,रणरागिनींनी वृक्षारोपणाने केला स्वातंत्र्यदिन साजरा.. Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads