Header AD

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मुरारी कदमांना अखेरचा सलाम
ठाणे , प्रतिनिधी  : खेळात हारजीत असते. त्यापेक्षा आपण आऊट होऊ नये यासाठी संघासह आपण स्वतः शेवटपर्यन्त प्रयत्न करत असतो. आयुष्याच्या खेळात कुटुंबासह चांगल्या पद्धतीने जगण्याचा  प्रयत्न  करत असतो. पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचे असते. परंतू समाजात अनेक व्यक्ती मेणबत्तीच्या प्रकाशाप्रमाणे विविध क्षेत्रात कार्य करत असतात.           त्यापैकी एक नाव कोकणचे सुपुत्र मुरारी कदम. मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी मुरारी कदम यांचे निधन झाले.  मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले सचिन कदम यांचे ते वडील. पोलीस खात्यात पुत्राचा नावलौकिक वाढत होता, याचे एक बाबा म्हणून मुरारी कदम यांना समाधान होते. हाफकिनमधील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीचा ध्यास शेवटपर्यंत जपला.          रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अडरे हे मुरारीराव निळकंठराव कदम यांचे मूळ गाव, कबड्डीला सुरूवातीच्या काळामध्ये हुतूतू नावाने ओळखले जायचे. त्यानंतर अनेक सुधारणा या खेळांमध्ये करण्यात आल्या. कबड्डी नावाला एक वलय प्राप्त झाले . परंतु आपल्या या समाजामध्ये असेही काही खेळाडू ज्यांनी कबड्डीच्या सुरूवातीच्या दिवसात म्हणजे हुतूतूपासून सुरुवात करून कबड्डीमध्ये नावलौकिक मिळवला, त्यात मुरारी कदम यांचा उल्लेख करावा लागेल.

 


         वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणेजच ६० च्या दशकात त्यांनी खेळायला सुरूवात केली. मुंबईतील ” यंग प्रभादेवी संघ ” या नावाजलेल्या कबड्डी संघातून त्यांनी मैदान गाजवले . कारकीर्दीच्या सुरूवातीला पार्ला कॉलेजमधून शिक्षण घेत असताना मुंबई युनिव्हर्सिटीसाठी मध्ये निवड झाली , कबड्डी खेळत असताना १ ९ ६२ साली हाफकिन बायो फार्मसी फार्मासिटिकल या कंपनीमध्ये खेळाडू म्हणून ते तेथे नोकरीस रूजु झाले .           त्यानंतर हाफकिन स्पोर्टस् मधून खेळत असताना त्यांनी अनेक व्यावसायिक स्पर्धामध्ये मैदाने गाजवून अनेक वेळा त्यांच्या कंपनीला विजतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तसेच अखिल भारतीय सचिवालयमध्ये सतत दोन वर्षे त्यांची निवड झाली . हाफकिनमध्ये खेळत असताना त्यांना संपूर्ण भारतभर कबड्डी खेळण्यासाठी संधी मिळत होती . या संधीचे त्यांनी सोने केले. तसेच महाराष्ट्र कबड्डी संघटनेसाठी त्यांनी केलेले योगदान अफाट होते.            त्यामुळे कबड्डी क्षेत्रातील नामांकित खेळाडू , तसेच संघटनेचे पदाधिकारी कायम त्यांचा आदर करत होते . अशा या हरहुन्नरी खेळाडुने त्यांच्या जिवनातील सतत ३५ वर्षे कबड्डी खेळाने अनेक मैदाने गाजवली आहेत. कबड्डी असो किंवा कामातला त्यांचा अभ्यास . या जोरावर त्यांची कंपनीमध्ये डायरेक्टर बोर्डवर सतत पाच वर्षे बिनविरोध निवड झाली होती. त्या शिवाय ते अडीचवर्ष कामगार प्रतिनिधी होते .          कामगार युनियनवर जनरल सेक्रेटरी या पदावर त्यांनी काम केले होते . कामगारांसाठी लढताना कामगार पतपेढी वर सात वर्षे जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार यांसारखी काही पदे त्यांनी यशस्वीरीत्या भुषविली. मुंबईत राहत असले तरी परशूरामाच्या पवित्र कोकणाच्या मातीशी त्यांची कायम नाळ जोडलेली होती. त्यांचे निघून जाणे हे अनेकांना चटका लावणारे होते. क्षत्रीय मराठा समाजामधली सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या कदमांच्या व्यक्तीमत्वास अखेरचा सलाम!!!

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मुरारी कदमांना अखेरचा सलाम सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मुरारी कदमांना अखेरचा सलाम Reviewed by News1 Marathi on August 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads