Header AD

ठाणे जिल्हा जलतरण संघटनेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जलतरणपटूचा सत्कार




डोंबिवली ( शंकर जाधव ) भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा जलतरणसंघटनेतर्फे जिल्ह्यातील शिवछ्त्रपती पुरस्कार विजेत्या जलतरणपटूचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. ठाणे शहरातील जलतरण असोसीएशनच्या कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.



            ठाणे जिल्हा जलतरण संघटनेमार्फत होतकरू खेळाडूना प्रोत्साहन दिले जात असून जिल्ह्यातील शुभम वनमाली, अश्विनकुमार, नील शेकटकर, मंत्रा कुऱ्हे, श्रावणी जाधव या जलतरणपटूचा शिव्छ्त्रपती पुरस्कार मिळवला असून या खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी स्वीमीन असोसीएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष दीपक मेजारी, उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत ७५ व्या स्वातंत्र्य दिन वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष सन्मान चिन्ह देऊन या खेळाडूना गौरविण्यात आले. 




             या कार्यक्रमास उमेश उत्तेकर, किरण फाटक, राजेश गावडे, संकेत सावंत, निमेश भोई, रुपाली रेपाळे, पंकज राठोड, अनिरुद्ध महाडिक, शशिकांत काळे, चंद्रशेखर निंबरे, स्वतेज कोळबकर, डॉक्टर तृप्ती कुऱ्हे हे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्हा जलतरण संघटनेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जलतरणपटूचा सत्कार ठाणे जिल्हा जलतरण संघटनेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जलतरणपटूचा सत्कार Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads