Header AD

स्टेशनबाहेर विना परवाना रिक्षा चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
डोंबिवली (शंकर जाधव )  डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेर अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांकडे परवाना नसल्याने मंगळवारी डोंबिवली वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.या ठिकाणी १८ रिक्षाचालकांकडे वाहतूक पोलिसांनी परवाना विचारला असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले.            वाहतूक पोलिसांनी अश्या रिक्षा वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेच्या आवारात आणल्या होत्या. विना परवाना  रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रत्येकी ५०० रुपये व गणवेश परिधान न करणे असे 200 रुपये असे  700  असे एकूण 18 रिक्षाचालकांकडून 12, 600 रुपये इतका दंड आकारण्यात आला.
स्टेशनबाहेर विना परवाना रिक्षा चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई स्टेशनबाहेर विना परवाना रिक्षा चालविणाऱ्यांवर  वाहतूक पोलिसांची  कारवाई Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads