Header AD

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कोळी बांधवाचे नारळी पौर्णिमे निमित्त समुद्राला साकडे





कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कल्याणमध्ये  कोळी बांधवानी नारळी पौर्णिमे निमित्त समुद्राला साकडे घातले.

 

          पावसाळ्यात उधाणलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अपर्ण करण्याची पद्धत आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने कोळी समाजात  नारळी पौर्णिमेच्या  उत्सवाला विशेष महत्व असते. 




          दरवर्षी कल्याणच्या शिवाजी चौकातून कोळी बांधव भगिनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत दुर्गाडी खाडीत समुद्राला नारळ अपर्ण करतात. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे मिरवणूक बंद असल्याने यंदा देखील  कोळी महासंघाचे उपाध्यक्ष देवानंद भोईर यांच्याहस्ते  अतिशय सध्या पद्धतीने उत्सव साजरा करत कल्याण खाडीत नारळ अपर्ण करण्यात आला.




          यावेळी जगावर घोंघावणारे करोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालण्यात आले.  देवानंद भोईर यांनी नागरिकांसाठी कोरोना लसीचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, मागील काही दिवसात आलेल्या चक्रीवादळ आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोळी बांधवाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या कोळी बांधवांना नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केली.
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कोळी बांधवाचे नारळी पौर्णिमे निमित्त समुद्राला साकडे कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कोळी बांधवाचे नारळी पौर्णिमे निमित्त समुद्राला साकडे Reviewed by News1 Marathi on August 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads