Header AD

महाड पूरग्रस्तांसाठी सरसावली टीम परिवर्तन

 

आंदवाटा प्रतिष्ठानजायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रोतिरंगा जागृती विचार मंचसान्वी सोशल वेलफेअर संघटनामान सन्मान प्रतिष्ठानचे भरीव योगदान..

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : नुकताच आलेल्या कोकणातील महापुरात अनेक समाजघटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपल्या याचं बांधवांना मदत करण्याचा दृष्टीने टीम परिवर्तन पुढे सरसावली आणि या कामांत त्यांना आंदवाटा प्रतिष्ठानजायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो आणि तिरंगा जागृती विचार मंचचे भरीव योगदान मिळाले.टीम परिवर्तनच्या विविध शहरांत असलेल्या समन्वयकांनी आपापल्या ठिकाणी नागरिकांनी त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या गोष्टी एकत्रित केल्या होत्या यांत प्रामुख्याने अन्नधान्यशैक्षणिक साहित्यऔषधीसॅनिटरी पॅड या गोष्टीचा समावेश होता. प्रत्येक घराला किमान लागणारी भांड्याचा सेट तयार करून महाड येथील लक्ष्मी आदिवासी वाडीरामवाडी आदिवासी वाडी येथे देण्यात आले. ज्या घरांचे नुकसान झाले अशा घरांना तात्पुरती सोय व्हावी यासाठी ताडपत्रीसतरंजीचादरटॉवेल यांची मदत करण्यात आली.दहिवड येथे आजूबाजूच्या गरजू नागरिकांना देण्यासाठी येथील युवक मंडळींकडे मोठ्या प्रमाणात चांगल्या स्थितीत असलेले कपडेजीवनावश्यक वस्तुशैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच वाघोलीमांघरूणपणदेरीदापोली या आदिवासी वाडीवर देखील मदत करण्यात आली आहे. आपत्तीकाळात वंचित समाजघटकांसाठी यापुढेही आम्हीं सर्व संस्था एकत्रित काम करणार असल्याचे यावेळीं टीम परिवर्तनच्या युवकांनी सांगितले त्याचबरोबर या मदतकार्यात वस्तू स्वरूपात आणि आर्थिक योगदान देणाऱ्या सर्व मंडळींचे देखील या युवकांनी आभार मानले.

महाड पूरग्रस्तांसाठी सरसावली टीम परिवर्तन महाड पूरग्रस्तांसाठी सरसावली टीम परिवर्तन Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads