Header AD

खडवली महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती मनसे च्या मागणीला आले यश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : खडवली महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे मनसेच्या मागणीला यश आले आहे.             गेल्या वर्षभरापासून महावितरणच्या खडवली कार्यालयातील कनिष्ठ अभियंता हे पद रिक्त होते. त्यामुळेव्ययस्थापणा अभावी नागरिकांना विजेच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. गेल्या काही महिन्यांपासूनहे रिक्त पद भरण्यात यावेयासाठी मनसे तर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता.           आजही पाठपुराव्यासाठी खडवली पंचक्रोशीतील मनसे पदाधिकारी दिनेश बेलकरेविषाल बारनिसलक्ष्मण भगतसंदेश लोणेमहेश कांबेरे आणि रुपेश कांबेरे यांच्या उपस्थितीत टिटवाळा महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या खडवली कार्यालयातील कनिष्ठ अभियंता पदावर अलंकार म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या मंगळवार पासून ते कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या अनुभवानुसार आणि व्यवस्थापन कौशल्याने लवकरच विजेच्या समस्या मार्गी लागतील अशी आशा मनसे पदाधिकारी दिनेश बेलकरे यांनी व्यक्त केली आहे.

खडवली महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती मनसे च्या मागणीला आले यश खडवली महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती मनसे च्या मागणीला आले यश Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads