Header AD

जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर कल्याण डोंबिवलीतील ४ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
कल्याण,  कुणाल  म्हात्रे  :  कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली नसून सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत कारवाई केली जाते आहे.              त्यातच भाजपने कल्याण डोंबिवलीत जनआशीर्वाद यात्रा काढून नागरिकांची गर्दी जमविल्याने कोरोना नियम पायदळी तुडवले. त्यामुळे  कल्याण डोंबिवलीतील  मानपाडाकोळसेवाडीमहात्मा फुलेआणि खडकपाडा  पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार डझनभराच्यावर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.               महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचे आदेशाचे पालन बंधनकारक असतानाच ठाणे जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा  गेल्या दोन दिवसापासून  ठिकठिकाणी काढण्यात येत आहे.            हि यात्रा १९ ऑगष्टपर्यत सुरु राहणार असून या यात्रेत मनाई आदेशाचे उल्लंघन करत नागरिकांना  एकत्र जमा करणेमास्कचा वापर न केल्याने  भा.द.वी.कलम १८८,२६९,२७० सह साथीचा रोग कायदा १८९७ चे कलम २,,४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ( ब ) महा. पो.अधि.सन १९५१ चे कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे आयोजकांवर कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.१७ ऑगस्ट रोजी  सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास  जन आशीर्वाद कार्यक्रमात वेळी डोंबिवली नागरीक सहकारीबँक चौकातसोनारपाडा कल्याण शिळ रोद येथे जन आशीर्वाद यात्रा काढून नियमांचे पालन न केल्याप्रकरणी  भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईरनंदू परबभाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळेसंजय उर्फ बबलू तिवारीदत्ता माळेकर व इतर पदाधिकारी  व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.          आज कल्याणाच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथापासून सुरु झालेल्या जन आशीर्वाद यात्रा कल्याण पश्चिमटिटवाळा  मार्गे उल्हासनगरअंबरनाथबदलापूरला यात्रा  विविध मार्गावरून सुरु आहे. मात्र यात्रेमुळे एक ते अर्धातास वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.           तर उद्या १९ ऑगस्ट रोजी मुरबाडशहापूरमार्गे  भिवंडीत येऊन यात्रेची सांगता होणार आहे. त्यामुळे उल्हासनगरअंबरनाथ बदलापूर मुरबाडशहापूरभिवंडी या शहरातील विवीध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने जन आशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल होण्याचे सावट पसरले आहे.जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर कल्याण डोंबिवलीतील ४ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर कल्याण डोंबिवलीतील ४ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads