Header AD

स्मार्ट सिटीच्या बैठकीत शानू पठाण आक्रमक पारसिक चौपाटीच्या कामाला गती मिळणार
ठाणे (प्रतिनिधी) - स्मार्ट सिटीच्या नावाखाली ठाणे पालिकेने अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही कामे रखडलेली आहेत. स्थानिकांच्या छोट्या-छोट्या समस्या मार्गी न लावल्यामुळेच पारसिक चौपाटीचे काम रखडले आहे. हे काम तत्काळ मार्गी लावावे, असे सांगत विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी आक्रमक भूमिका धारण केली. त्यावर राज्याचे अतिरिक्त प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पारसिक चौपाटीच्या कामाला आगामी 15 दिवसात सुरुवात करावी, असे आदेश दिले.           स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनुकुमार श्रीवास्तव यांनी बैठक घेतली. या ऑनलाईन बैठकीला पालिका आयुक्त विपीन शर्मा, महापौर नरेश म्हस्के आदी सहभागी झाले होते. यावेळी शानू पठाण यांनी स्मार्ट सिटीच्या कामात होणार्‍या दिरंगाईबद्दल प्रशासनावर टीकेची झोड उठविली.         स्मार्ट सिटीच्या 30 पैकी 15 पूर्ण झाले असून 5 कामे रखडली असून 10 कामे सुरु आहेत.या पाच कामांमध्ये पारसिक चौपाटीचाही समावेश आहे. ठाणे शहराचे नाव देशपातळीवर जावे, यासाठी डाॅक्टर जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्याकडून हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. मात्र आता हे  काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. स्थानिकांच्या अगदीच क्षुल्लक अशा मागण्या प्रशासनाकडून पूर्ण केल्या जात नसल्यानेच हे काम रखडलेले आहे.          जर ही चौपाटी पूर्णत्वास आली तर देशामध्ये ठाणे शहराचे नावलौोकक वाढणार आहे. पण, प्रशासनाला त्याचे देणेघेणे नाही. आता पर्यंत या चौपाटीवर बराच खर्च करण्यात आलेला आहे. जर, हे काम पूर्ण झाले नाही तर नक्कीच हा खर्च वाया जाईल. त्यामुळे तत्काळ हे काम पूर्ण करावे, अशी मागणी पठाण यांनी केली.           दरम्यान, पठाण यांची ही मागणी गांभीर्याने घेत मनुकुमार श्रीवास्तव यांनी पारसिक चौपाटीच्या कामाला तत्काळ सुरुवात करावी. आगामी 15 दिवसात कामाला सुरुवात करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

स्मार्ट सिटीच्या बैठकीत शानू पठाण आक्रमक पारसिक चौपाटीच्या कामाला गती मिळणार स्मार्ट सिटीच्या बैठकीत शानू पठाण आक्रमक पारसिक चौपाटीच्या कामाला गती मिळणार Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads