Header AD

कल्याणात प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला गर्दी


■ना मास्क, सोशल डिस्टसिंगचा विसर व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कल्याणमधील चार व्यावसायिकांनी काल कल्याण पश्चिमेकडील सॉलिटर बेंक्विट हॉलमध्ये संगीत कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक आल्या होत्या.
               या कार्यक्रमात गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी विशेषतः तरुण तरुणींनी एकच गर्दी केली होती. गर्दी तर सोडाच मात्र गाणी सुरू होताच जमलेल्या लोकांना ना मास्क चे भान राहिले ना सोशल डिस्टसिंगचे. कोरोना नियमांची पायममल्ली या कार्यक्रमात झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली असली तिसऱ्या लाटेचा धोका आजही कायम आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अर्थ व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून सरकारने लोकडाऊनमधील निर्बध शिथिल केलेत. 

मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग ठेवणं, अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यानंतर देखील नागरिकांकडून सुरू असलेली बेफिकिरी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

कल्याणात प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला गर्दी कल्याणात प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला गर्दी Reviewed by News1 Marathi on August 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads