Header AD

नमामि गंगे’च्या धर्तीवर वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी १२०८.४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा


■खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी  जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची घेतली भेट..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी आणि उल्हास नदी या दोन नद्या पाच शहरांमधून जात असून सुमारे ५० लाख नागरिकांच्या पाण्याची तहान भागवत आहेततसेच या नद्यांच्या पाण्याचा वापर पिकांसाठीही केला जातो. मात्रया नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याने लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.            नमामि गंगेच्या धर्तीवर या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराजांकडून उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी २११.३४ कोटी तर वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी ९९७.१३ कोटीच्या एकूण १२०८.४७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहेत्यास तातडीने मंजुरी देण्यात यावीअशी आग्रही मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय जल-शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचेकडे केली.             महाराष्ट्र सरकारने राज्यातील २१ नद्यांचे “Mission for Clean Rivers in Maharashtra” या मोहिमे अंतर्गत पुर्नजिवितकरण करण्याचे जाहीर केले असून कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ९९७.१३ कोटी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी २११.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडे सदर निधी मंजुरीकरिता महाराष्ट्र शासनाने अहवाल पाठवला आहे.            तरी नमामि गंगेच्या धर्तीवर वालधुनी आणि उल्हास नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधी जलशक्ति मंत्रलयाने लवकरात लवकर मंजूर करावा, त्याचबरोबर भविष्यात या नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) सारख्या त्रयस्थ संस्थेकडे सदर कामाच्या लेखापरिक्षणाचे काम देण्यात यावे, जेणेकरुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) सारख्या संस्थांना अहवाल सादर करतील, याकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान जलशक्ती मंत्रालय, दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून जल-शक्ती मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.कल्याण-उल्हासनगर परीसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत आजूबाजूच्या वस्तीमधून सांडपाणी सोडले जाते. अनेक टाकाऊ वस्तू व नदी परिसरातील काही कंपन्यांकडून रसायन मिश्रित पाणी नदीत राजरोसपणे सोडले जाते. यामुळे या दोन्ही नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्या असून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीतील पाणी तसेच नदीखालील भूस्तर प्रदुषित होत असून या प्रदुषित पाण्यामुळे नदीचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुद्धा दूषित होण्याचा मोठा धोका संभवत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. या दोन्ही नद्यांचे पुर्नजिवितकरण हा खूप खार्चिक भाग असून तो खर्च स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडणारा नाही. १६ व्या लोकसभेपासून कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या दोन्ही नद्यांचे शुध्दीकरण तथा पुर्नजिवितकरण करावे, यासाठी अनेक वेळा हा गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता, मागील अधिवेशन काळामध्ये देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वालधुनी आणि उल्हास नदी या नद्यांच्या पुर्नजिवितकरण कामासाठी केद्र सरकारने निधी द्यावा अशी मागणी केली होती.

नमामि गंगे’च्या धर्तीवर वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी १२०८.४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा नमामि गंगे’च्या धर्तीवर  वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी १२०८.४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा Reviewed by News1 Marathi on August 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads