Header AD

स्किल इंडियाच्या लाभार्थी युवकांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

 

■जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय राज्य मंत्र्यां मार्फत मोदींना दिले आभार पत्र..


कल्याण ,कुणाल  म्हात्रे  :  केंद्र शासनाच्या स्किल इंडिया योजनेचे लाभार्थी विद्यार्थी व युवकांनी कल्याणमधील जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केली असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष नितीन सकपाळकल्याण शहर सरचिटणीस गौरव गुजरयुवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ गोईकनेयुवा मोर्चा पदाधिकारी जितेंद्र तावडेतेजस केंबारे, रमेश गोरे, प्रताप तुमकर यांच्या नेतृत्वाखाली या सर्व विद्यार्थ्यांनी सहजानंद चौकात केंद्रीय राज्यमंत्री कपिल यांची भेट घेऊन  नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.एकीकडे सुशिक्षित बेकारांची वाढणारी संख्या तर दुसरीकडे विविध क्षेत्रांसाठी कौशल्यप्रधान मनुष्यबळाचा तुटवडा अशा स्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोगाच्या माध्यमातून वर्ष २०२२ पर्यंत ४० कोटी मनुष्यबळास प्रशिक्षित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे.काम करण्याची क्षमता असलेल्या हातांंची संख्या भारतात २०२२ मध्ये जगात सर्वाधिक असेल. त्या दृष्टीने प्रशिक्षणासाठी युवकांना तयार करणे हे मोठे आव्हान आहे. उद्योजक सध्या कुशलअर्धकुशल आणि अकुशल कामगारांना वेगवेगळी वेतनश्रेणी देतात. देशाची लोकसंख्या विचारात घेता सध्या दोन टक्के लोकांकडेच कुशल प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आहे. स्किल इंडियाच्या प्रशिक्षणात कल्याण मधील अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तर अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत यातील काहींनी  प्रातिनिधिक स्वरूपात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 

स्किल इंडियाच्या लाभार्थी युवकांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार स्किल इंडियाच्या लाभार्थी युवकांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads