Header AD

लेडी इंजिनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करत निसर्ग वाचविण्याचा संदेश

 कल्याण , कुणाल म्हात्रे  :  लेडी इंजिनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच वृक्षारोपण करून व कोरोना वारीयर्स यांना भेटकार्ड देऊन  निसर्ग वाचविण्याचा संदेश दिला.  कलाशिक्षक आनंदकिशोर मेहर यांच्या सृजनशील पुढाकाराने शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांना "वृक्षारोपण करा व निसर्ग वाचवा" या विषयावर जनजागृती चित्र स्वातंत्र्यदिनानिमित्त रंगवायला सांगितले. त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन रोपं लावायला सांगितले होते. हस्तकला या विषयांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन ते चार सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवून कोरोना वारीयर्स यांना भेट देण्यात आली.मुख्याध्यापक एरीक अलाविया, सुपरवायझर रीमा कश्मीरी व प्रायमरी हेड श्रावणी पवार शाळेतील सर्व सहकारी वर्ग व पालक यांच्या सहकार्यामुळे चित्रकला जनजागृती उपक्रमवृक्षारोपण उपक्रम व कोरोना वायरियर्स यांना भेट कार्ड देण्याचा उपक्रम यशस्वी झाला.  हा उपक्रम विद्यार्थी आता जेथे आहे तेथेच करायला सांगितला असल्यामुळे जे विद्यार्थी गावाला आहेत त्यांनी तिथेच शेतीची कामे केलीभात शेती लावली व बांधावर ही झाडे लावित मजा केलीशहरातील विद्यार्थ्यांनी आपल्या गॅलरीत व मोकळ्या जागी झाडे लावून वृक्षारोपणाचा आनंद लुटला.त्याच प्रमाणे कोरोना वारीयर्स यांना भेट कार्ड देऊन त्यांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या परिसरातील डॉक्टर, शिक्षकपोलीसनर्ससफाई कामगार यांना वैयक्तिक धन्यवाद देत ग्रीटिंग कार्ड भेट म्हणुन दिले. हाताने बनविलेले सुंदर भेटकार्ड मिळाल्या मुळे व आपल्या कार्याची समाज बांधव व विद्यार्थ्यांनी दखल घेतल्यामुळे सर्वच कोरना वारीयर्स यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान झळकत होता. त्यांनी विद्यार्थ्यांचे मनसोक्तपणे कौतुक केले. शाळेच्या विद्यार्थी व पालकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे जवळ जवळ एक हजार वारीयर्स यांना भेट कार्ड देण्यात आले व ७०० पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात आले.

लेडी इंजिनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करत निसर्ग वाचविण्याचा संदेश लेडी इंजिनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करत निसर्ग वाचविण्याचा संदेश  Reviewed by News1 Marathi on August 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads