Header AD

नागपंचमीच्या दिवशी नागाला मिळाले जीवनदान कल्याण मधील खाजगी शाळेच्या पार्किंग मध्ये आला ५ ते ६ फुटी नाग




कल्याण , कुणाल  म्हात्रे : श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. हिंदू संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. याच दिवशी नागोबाला पुजण्याची प्रथा परंपरा हिंदु धर्मात जन्माला आली आहे. आज नागपंचमीच्या दिवशी कल्याणच्या बिर्ला स्कूल मध्ये नाग आला असल्याची माहिती स्थानिक लोकांनी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. 



           या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचून ५ ते ६ फुटी नागाला कोणतीही इजा न होऊ देता पकडून स्थानिक सर्पमित्र दत्ता भोंबे यांच्या माध्यमातून कल्याण फॉरेस्टच्या स्वाधीन करून जंगलात सोडून दिले. त्यामुळे नागपंचमी दिनी अग्निशामक दल व सर्प मित्रांनी मिळून नागाला जीवनदान दिले आहे.

नागपंचमीच्या दिवशी नागाला मिळाले जीवनदान कल्याण मधील खाजगी शाळेच्या पार्किंग मध्ये आला ५ ते ६ फुटी नाग नागपंचमीच्या दिवशी नागाला मिळाले जीवनदान कल्याण मधील खाजगी शाळेच्या पार्किंग मध्ये आला ५ ते ६ फुटी नाग Reviewed by News1 Marathi on August 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads