Header AD

झोपडपट्टी तील नागरिकांना लस मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न


 



डोंबिवली ( शंकर जाधव ) मुंबईतील धारावीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यासाठी शासनाने करोना नियमांबरोबर लसीकरण मोहिमेवर भर दिला होता.करोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने याठिकाणची आकडेवारी वाढली नाही.




        त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवलीतील शहरातील झोपडपट्टी वस्तीत जास्ती जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे.याकरता वंचित बहुजन आघाडीचे जोरदार  प्रयत्न सुरु असून पालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांना लस लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न व्हावा अशी मागणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

 


 

     कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या १३ लाखाच्या आसपास असून पालिका क्षेत्रात एकूण ७२ झोपडपट्टी आहेत.या वस्तीत लसीकरण मोहीम राबबावी याकरता  वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोकेमहासचिव मिलींद साळवेउपाध्यक्ष राजू काकडे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले.





        सदर निवेदनात असेही म्हटले आहे कीकरोना प्रतिबंधीत लस देण्याचा स्तुत्य उपक्रमासाठी राजकीय पक्षाच्या कार्यालयाचा वापर किंवा राजकीय व्यक्तीकडे वस्तीपातळीवर लसीकरण करत असताना राजकीय पुढाऱ्याकडे टोकण देऊ नयेत ज्या वस्तीपातळीवर आपण प्रतिबंधत लस देत आहात त्या ठिकाणी ही राजकीय मंडळी दुजाभाव करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 





      आपल्या नातेवाईक मित्रमंडळीना लस देऊन इतराना वाऱ्यावर सोडत आहे त्यामुळे आपण अधिकारी वर्गाला सूचना देवून वस्तीपातळीवरील समाजमंदिरेतसेच आंगणवाडीचा वापर लसीकरणासाठी करण्याच्या आदेश द्यावेत यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी. आमच्या या मागणीवर योग्य कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडी लोकशाही पध्दतीने आपल्या कायालयासमोर आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे.

झोपडपट्टी तील नागरिकांना लस मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न झोपडपट्टी तील नागरिकांना लस मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न  Reviewed by News1 Marathi on August 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads