Header AD

भिवंडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यां मंजुळा अनंता सोनावणे यांचे निधन..




भिवंडी दि 16 (प्रतिनिधी ) तालुक्यातील भरे गावात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां मंजुळा अनंता सोनावणे यांचे   अल्पशा आजाराने निधन झाले असून  पालघर  तालुक्यातील धुकटान गावात त्यांना   त्यांच्या माहेरच्या कुटुंबातून  आंबेडकरी चळवळीचे धडे मिळाले होते त्यामुळे  आंबेडकरी विचारांचा वसा  कायम ठेवून  सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी समाज हिताची कामे केली आहेत सर्वात प्रथम ग्रामीण भागात राहून त्यांनी त्यांचा मुलगा रुपेश सोनवणे  यास वकील बनवले असून समाज बांधवासह आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी मुलाला तयार केला .



            
             असून त्यांचा मुलगा रुपेश हा ग्रामीण, आदिवासी पाड्यावर जाऊन ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या   लहान मुलांना गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या काळात  डोंगरांवर जाऊन   शिक्षणाचे धडे देत आहे यासाठी त्यांचा  मुलगा आणि सून यांना समाजकार्याची आवड निर्माण करून दिली आहे.




            त्याच प्रमाणे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून रुपेश हा मुलगा आदिवासी,गरीब  बांधवांना न्यायालयीन लढाई लढत आहे मंजुळा सोनावणे यांच्या पश्चात  पती अनंता आणि रुपेश,ऊमेश आणि एक मुलगी आहे, भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील  भरे या गावात राहून देखील समाज कार्याची आवड असणाऱ्या मंजुळा सोनावणे यांनी आपल्या मुलांना देखील समाजकार्यात उतरवून त्यांच्या माध्यमातून समाज कार्य सुरु ठेवला हा त्यांचा आदर्श घेणे महत्वाचा ठरत आहे..
भिवंडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यां मंजुळा अनंता सोनावणे यांचे निधन.. भिवंडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यां मंजुळा अनंता  सोनावणे यांचे निधन.. Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads