Header AD

टाळेबंदीमुळे सुमारे देशात एक लाख कॅन्सर रुग्ण दगावण्याची शक्यता ( कॅन्सरतज्ञ डॉ. अनिल हेरून यांचे मत )

डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोना महामारीच्या ताळे बंदीमुळे देशात सुमारे एक लाख कॅन्सर रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याचे मत कॅन्सरतज्ञ डॉ. अनिल हेरूर यांनी व्यक्त केले. डोंबिवलीतील नेत्रतज्ञ डॉ. अनघा हेरूर यांच्या डोंबिवली ग्रामीण विभागातील लोढा हेवन पलावा येथील अनिल आय हॉस्पिटल शाखेचा शुभारंभ आमदार राजू पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी डॉ. अनिल हेरूर यांनी विविध विषयावर भाष्य केले.          यावेळी आमदार राजू पाटील यांनी डॉ. अनघा हेरूर यांना नवीन आय हॉस्पिटलबाबत शुभेच्छा देऊन ग्रामीण विभागातील डोळ्याच्या रुग्णांसाठी ताबडतोब सेवा मिळेल कारण वाहतूक कोंडीमुळे शहर गाठण्यासाठी भरपूर वेळ होतो तो प्रश्न मार्गी लागेल असेही सांगितले. यावेळी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही डॉ. हेरूर यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ. अनिल हेरूर म्हणाले, ताळेबंदीमुळे कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या. काहींना कॅन्सर प्रथम स्टेजमध्ये उपचार घेता न आल्याने रोग बळावला असल्याची माहिती आहे. 
             परिणामी  कॅन्सर रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. दरम्यान डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, सध्या डिजिटल माध्यमातून कामे होत असून त्याचा परिणाम डोळ्यांवर होत आहे. लहान मुले, तरुण वर्ग, महिला आणि जेष्ठ नागरिक डोळ्यांच्या वाढीमुळे समस्याग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात वर्क फॉर्म होम या प्रक्रियेमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्या लॅपटॉप, मोबाईल वापर सर्वच क्षेत्रात मोठ्या वाढला आहे. दिवसातून जास्त तास डिजिटल माध्यमातून खर्ची होत असून यामध्ये गृहिणी सुद्धा आघाडीवर असतात. 

            आजकाल रात्री मोबाईल वापरावर भर असून त्याचा परिणाम झोपेवर होतो आणि डोळ्यांच्या समस्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवास कठीण होत चालला आहे. ग्रामीण भागातून शहर गाठणे जिकरीचे होत आहे. ग्रामीण विभागातील नागरिकांना ताबडतोब सेवा मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण विभागात अनिल आय हॉस्पिटल शाखा उघडल्याचे डॉ. अनघा हेरूर यांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे सुमारे देशात एक लाख कॅन्सर रुग्ण दगावण्याची शक्यता ( कॅन्सरतज्ञ डॉ. अनिल हेरून यांचे मत ) टाळेबंदीमुळे सुमारे देशात एक लाख कॅन्सर रुग्ण दगावण्याची शक्यता ( कॅन्सरतज्ञ डॉ. अनिल हेरून यांचे मत ) Reviewed by News1 Marathi on August 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads