Header AD

सेलिब्रिटीजना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हिपीचे खास फिचर


सिनेमातील एपिक सीन, डायलॉग, डान्स मूव्हद्वारे देता येतील शुभेच्छा....


मुंबई, १० ऑगस्ट २०२१  : चाहत्यांच्या मनोरंजनाचा विषय निघतो, तेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटी कोणतीही कसर सोडत नाहीत. सुपर हॉट डान्स नंबर, जबरदस्त अॅक्शन थ्रिलर, आरामदायी सुरावट आणि सुंदर लव्ह ट्रॅक्सद्वारे सेलिब्रिटी आपल्या मनावर राज्य करतात. चाहतेदेखील त्या प्रेमचा परतावा अनेक पटींनी करतात. विशेषत: सेलिब्रेटिंच्या वाढदिवसाला. याच कल्पनेतून हिपी या भारतातील वेगाने वाढणाऱ्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मने बी टाऊन स्टार्सचे वाढदिवस स्वॅग आणि स्टाइलने साजरे करण्यासाठी मनोरंजक उपक्रम राबवले आहेत.       मिकासारखा संगीतातील दिग्गजापासून ते रणवीर सिंगसारख्या गली बॉयपर्यंत क्रिएटर्स त्यांच्या पसंतीच्या बॉलिवूड सेलिब्रेटिचा वाढदिवस साजरा करू शकतात. यावेळी ब्लॉकबस्टर मूव्हिजमधील एपिक सीन तयार करणे, डायलॉग किंवा डान्स मूव्ह/ हूक स्टेप तयार करणे इत्यादी फन चॅलेंजमध्ये त्यांना भाग घेता येऊ शकतो.        बी-टाऊनच्या हॉट सेन्सेशन आणि ‘नॉक-नॉक’ विनोदांचे प्रशंसक, सारा अली खान आणि भारताचे आवडते विनोदी कलाकार जॉनी लीव्हर ऑगस्टमध्ये येतील. क्रिएटर्स ‘हॅपी बर्थडे’ फिल्टर वापरून तसेच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या (कूली नं १, केदारनाथ आणि दीवाना मस्ताना) प्रसिद्ध चित्रपटांतील ऑडिओ ट्रॅक आणि क्लिपिंग वापरत आनंददायी व्हिडिओ रेकॉर्ड करून यांना शुभेच्छा देऊ शकतात.

सेलिब्रिटीजना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हिपीचे खास फिचर सेलिब्रिटीजना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हिपीचे खास फिचर Reviewed by News1 Marathi on August 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व येथे ,  आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून    रविवारी  ' ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी '  उप...

Post AD

home ads