Header AD

महापालिका परिसरातील रस्त्यांचा होणार कायापालट

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता कायापालट होणार असून महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगादेखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने क्रेडाय एमसीएचआयकल्याण यांच्या बरोबर नुकताच एक सामंजस्य करार केला आहे.महापालिकेच्या विकास आराखडयातील वाहतूक बेटेरस्ता दुभाजक इ. चे सुशोभिकरणनिगादेखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. यानुसार रस्ता दुभाजकचौक यामध्ये हिरवळझाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगादेखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला व गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे व वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे व किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे. त्याबदल्यात वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिराती चे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे. व तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.           महापालिका क्षेत्रातील पुना लिंक रोड( सुचक नाका) ते विठ्ठलवाडी चक्की नाका ते मलंग रोडचेतना नाका ते साकेत कॉलेजनेतीवली नाका ते चक्की नाकामूरबाड डायव्हर्शन रोड( दुर्गाडी ते प्रेम ऑटो)गांधारी रोड ( लाल चौकी ते गांधारी पुल)संतोषी माता रोड ( सहजानंद चौक ते इंदिरा नगर)बेतुरकरपाडा ते खडकपाडाबारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल)बिर्ला कॉलेज ते चिकणघरनिक्की नगर ते माधव संकल्पनिक्की नगर मधील भोईर चौकविशाल भोईर चौक ते उंबर्डे रोडएमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्सकोलीवली रोडविश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी,काली मश्जिद ते चिकणघरप्रेम ऑटो ते शहाड पूलशहाड – मोहने रोडवैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशनटिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर,रेल्वे समांतर (90 फुट रोड)ठाकुर्लीसावित्रीबाई फुले नाटयगृह रोडघारडा चौक ते मंजूनाथ शाळा या 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजकांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व)म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड  कल्याण (पूर्व),  कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कलसेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कलकोलीवली सर्कलप्रांत ऑफिस वायले नगर चौकटिटवाळा मंदिर सर्कल अशी 7 वाहतूकबेटे/सर्कल यांचे सुशोभीकरण करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिली आहे. यानंतर याबाबतचा करारनामा नुकताच महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आणि क्रेडाय एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटीलमुख्य उदयान अधिक्षक संजय जाधवक्रेडाय एमसीएचआयचे सेक्रेटरी विकास जैनखजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते.

महापालिका परिसरातील रस्त्यांचा होणार कायापालट महापालिका परिसरातील रस्त्यांचा होणार कायापालट  Reviewed by News1 Marathi on August 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads