Header AD

एनआरसी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिष्ठमंडळाने घेतली रामदास आठवले यांची भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण नजीकच्या  एनआरसी कंपनीतील बेरोजगार कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात  केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर कामगारांच्या शिष्टमंडळाने काही लोकप्रतिनिधींसह भेट घेऊन कामगारांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याची विनंती केली.या शिष्ठमंडळात कामगार प्रतिनिधीयुनियन पदाधिकारीभूमी पुत्र कामगार संघर्ष समिती, महिला प्रतिनिधी तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी ठाणे जिल्हा निबंधक  सहकारी संस्था कामगार आयुक्त ठाणेपीएफ़चे  अधिकारी  व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.कामगारोच्या वतीने जे. सी. कटारिया, उदय चौधरीअविनाश नाईक, सुभाष पाटीलमाजी नगरसेवक भीमराव डोळस,  दासू ठोबरे यांनी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत माहिती दिली. यावेळी रामदास आठवले यांनी या कामगारांचे प्रश्न  सोडविण्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन याबाबत  अदानी उद्योग समूह  यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन न्याय मिळण्याकामी सर्वं प्रकारचे आश्वासन दिले.या बैठकीस माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, रामदास वळसे, अर्जुन पाटीलसुरेश पाटीलएस बी शुक्ला संजय वाघमारे फरीदा  पठाण , राजेश त्रिपाठी,  मछिंद्र दवचे यांच्यासह अन्य कामगारही उपस्थित होते.


एनआरसी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिष्ठमंडळाने घेतली रामदास आठवले यांची भेट एनआरसी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिष्ठमंडळाने घेतली रामदास आठवले यांची भेट Reviewed by News1 Marathi on August 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads